'भूल भूलैय्या ३'मध्ये मजनू भाईची एन्ट्री? ट्रेलरमधील 'त्या' एका सीनमुळे प्रेक्षकांना बसला सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 15:18 IST2024-10-10T15:17:46+5:302024-10-10T15:18:53+5:30
'वेलकम'मधील मजनू भाई अर्थात अनिल कपूर 'भूल भूलैय्या ३'मध्ये दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (bhool bulaiyya 3)

'भूल भूलैय्या ३'मध्ये मजनू भाईची एन्ट्री? ट्रेलरमधील 'त्या' एका सीनमुळे प्रेक्षकांना बसला सुखद धक्का
'भूल भूलैय्या ३'ची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमाचा टीझर काही दिवसांपुर्वी रिलीज झाला. अशातच नुकताच 'भूल भूलैय्या ३'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर काल चाहत्यांच्या भेटीला आला. जयपूरमध्ये 'भूल भूलैय्या ३'च्या ट्रेलर भव्य पद्धतीने लॉंच करण्यात आला. यावेळी सिनेमातील प्रमुख कलाकार आणि चाहते उपस्थित होते. 'भूल भूलैय्या ३'चा ट्रेलर पाहून चाहत्यांना अनेक सरप्राइज मिळाले. यातील एक म्हणजे अनिल कपूर यांचं. काय आहे नेमकं? जाणून घ्या.
'भूल भूलैय्या ३' दिसणार अनिल कपूर?
'भूल भूलैय्या ३'च्या ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित, विद्या बालन, कार्तिक आर्यन, संजय मिश्रा, राजपाल यादव आणि तृप्ती डिमरी हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना अनेक सरप्राइज मिळाले. यातील एक मोठं सरप्राइज म्हणजे 'वेलकम'मधील मजनू भाईचं. अर्थात अनिल कपूर यांची 'भूल भूलैय्या ३'मध्ये एन्ट्री होणार असल्याची अटकळ बांधली जात आहे. यामागचं कारण म्हणजे 'भूल भूलैय्या ३'च्या ट्रेलरमध्ये एक सीन आहे. त्यात एका भिंतीवर पेन्टिंग दिसतं. हे पेन्टिंग हुबेहुब 'वेलकम'मध्ये मजनू भाईने जे पेन्टिंग काढलं होतं अगदी तसंच आहे. त्यामुळे 'भूल भूलैय्या ३'चं वेलकमशी कनेक्शन जोडल्याने लोकप्रिय अभिनेते अनिल कपूर या सिनेमात दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता सिनेमा रिलीज झाल्यावरच याविषयी कळेल.
'भूल भूलैय्या ३'कधी रिलीज होणार?
'भूल भूलैय्या ३' दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी भिडणार आहे. २००७ साली 'भूल भुलैय्या'चा पहिला भाग आला होता. तर २०२२ साली याचा सीक्वेल आला होता. पहिल्या भागात अक्षय कुमारने सर्वांचं मन जिंकलं होतं. तर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यननेही कमाल केली होती. आता तिसऱ्या भागात विद्या बालनने कमबॅक केलं आहे तर माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे. आता अनिल कपूरची 'भूल भूलैय्या ३'मध्ये एन्ट्री होणार का, हे सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.