महेश भट यांच्या 'सडक2' मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री, अशी असणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 18:23 IST2020-04-27T18:06:22+5:302020-04-27T18:23:28+5:30
१९९१ मध्ये ‘सडक’ चित्रपट प्रचंड गाजला होता

महेश भट यांच्या 'सडक2' मध्ये 'या' मराठमोळ्या अभिनेत्याची एंट्री, अशी असणार भूमिका
नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्हीच्या माध्यमातून मकरंद देशपांडे यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. दगडी चाळ सिनेमात त्याने साकारलेली डॅडीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. मकरंदची वर्णी आता महेश भट यांच्या ‘सडक2’मध्ये लागली आहे. त्याने हा सिनेमा साईन केला आहे. यात मकरंद खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. १९९१ मध्ये आलेल्या ‘सडक’ या सिनेमाचे दिग्दर्शन महेश भट यांनी केले होते. २० वर्षांपूर्वी महेश भट्ट यांनी दिग्दर्शन सोडले होते. पण आता तब्बल दोन दशकानंतर ते पुन्हा एकदा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतले आहेत.
मकरंद आणि आलियासह यात संजय दत्त, पूजा भट्ट आणि आदित्य राय कपूर अशी जबरदस्त स्टारकास्ट असणार आहे. १९९१ मध्ये ‘सडक’ चित्रपट प्रचंड गाजला होता. यातील चार्टबस्टर म्युझिक लोकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. या चित्रपटाने संजय दत्त रातोरात स्टार झाला होता. यात पूजा भट्ट व संजय दत्त मुख्य भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटात संजय दत्त एका वेश्याव्यवसायात ढकलण्यात येत असलेल्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि यानंतर दलालांपासून तिला वाचवतो, असे दाखवले गेले होते. हीच कथा पुढे नेत‘सडक 2’मध्ये संजय दत्त व त्याच्या मुलीची भूमिका दाखवली जात आहे. यात पूजा भट्ट फ्लॅशबॅकमध्ये दिसणार आहे. आता ‘सडक 2’कसा रंगतो, ते बघूच. तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा. २५ मार्च २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येईल.