श्वेता बासू प्रसाद करणार १३ डिसेंबरला लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 16:38 IST2018-11-29T16:29:55+5:302018-11-29T16:38:02+5:30
कहानी घर घर की या मालिकेत श्वेता बासू प्रसादने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती मकडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. नुकतीच तिची चंद्र नंदिनी ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांची लाडकी श्वेता १३ डिसेंबरला लग्न करत आहे.

श्वेता बासू प्रसाद करणार १३ डिसेंबरला लग्न
बॉलिवूड इंडस्ट्रीत आणि छोट्या पडद्यावर सध्या लग्नाचा मौसम सुरू आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी नुकतेच लग्न केले. त्यांच्यानंतर प्रियांका चोप्रा तिचा प्रियकर निक जोनास सोबत लग्न करणार आहे. कॉमेडी किंग कपिल शर्मा १२ डिसेंबरला लग्नबंधनात अडकत आहे तर आयटम गर्ल राखी सावंतने देखील तिच्या लग्नाची नुकतीच घोषणा केली आहे. आता या बॉलिवूड आणि टिव्हीवरील सेलिब्रेटींनंतर छोट्या पडद्यावर आणखी एक सेलिब्रेटी लग्न करणार आहे.
कहानी घर घर की या मालिकेत श्वेता बासू प्रसादने बालकलाकाराची भूमिका बजावली होती. त्याच्यानंतर ती मकडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. नुकतीच तिची चंद्र नंदिनी ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. प्रेक्षकांची लाडकी श्वेता प्रियकर रोहित मित्तलसोबत १३ डिसेंबरला लग्न करत आहे. हे लग्न पुण्यात होणार असून रिसेप्शन मुंबईत असणार आहे. श्वेता ही बंगाली असून रोहित हा मारवाडी आहे. त्यामुळे दोन्ही पद्धतीने ते लग्न करणार आहेत.
श्वेता आणि रोहित दोघेही फिल्म इंडस्ट्रीशी सबंधित आहे. या दोघांनाही जवळ आणण्यात दिग्दर्शक अनुराग कश्यपची मोठी भूमिका आहे. एका शॉर्टफिल्ममध्ये श्वेता आणि रोहित यांनी एकत्र काम केले होते. पुढे त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर प्रेम. श्वेता आणि रोहितच्या जवळच्या मित्रांचे मानाल तर सर्वप्रथम श्वेतानेच रोहितला प्रपोज केले होते. गोव्यात तिने रोहितला प्रपोज केले. यानंतर रोहितने पुण्यात श्वेताला लग्नाची मागणी घातली होती. श्वेता आणि रोहितने काहीच महिन्यांपूर्वी साखरपुडा केला.
२०१४ मध्ये श्वेता हैदराबादच्या बंजारा हिल्समध्ये एका सेक्स स्कँडलमध्ये अडकली होती. यामुळे दोन महिने तिला रेस्क्यू होममध्ये ठेवण्यात आले होते. पुढे हैदराबाद सेशन कोर्टने तिला क्लिनचीट दिली होती. या घटनेने श्वेताच्या करिअरवर मोठा परिणाम झाला होता. सेक्स स्कँडलमध्ये नाव आल्यानंतर पुढची दोन-एक वर्ष श्वेताना बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. २०१७ मध्ये ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये कमबॅक केला होता.
श्वेता सध्या बालीमध्ये मित्रमैत्रिणींसोबत बॅचलर पार्टीसाठी गेली आहे. तिनेच सोशल मीडियावर फोटो शेअर करून तिच्या फॅन्सना याविषयी सांगितले आहे.