वेश्या व्यवसायात अडकली होती 'मकडी'ची ही बालकलाकार, रेस्क्यू होममधून आल्यानंतर म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 12:41 PM2024-08-09T12:41:43+5:302024-08-09T12:44:37+5:30

'मकडी' फेम अभिनेत्री मोठ्या स्कँडलमध्ये अडकली होती,

Makdi fame actress Shweta Basu prasad acting journey she was trapped in a scandal | वेश्या व्यवसायात अडकली होती 'मकडी'ची ही बालकलाकार, रेस्क्यू होममधून आल्यानंतर म्हणाली...

वेश्या व्यवसायात अडकली होती 'मकडी'ची ही बालकलाकार, रेस्क्यू होममधून आल्यानंतर म्हणाली...

लहानपणी सर्वांनीच पाहिलेला हॉरर सिनेमा म्हणजे 'मकडी'. त्यावेळी या सिनेमाने लहान मुलांना चांगलंच घाबरवून सोडलं होतं. या सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारणारी ती अभिनेत्री आहे श्वेता बसू (Shweta Basu). श्वेताने मालिका आणि सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून अभिनयाला सुरुवात केली होती. मात्र मधल्या काळात ती अचानक गायब झाली. नंतर ती एका स्कँडलमध्ये अडकल्याचंही समोर आलं. नक्की काय प्रकरण होतं वाचा.

2014 साली अभिनेत्री श्वेता बसू वेश्या व्यवसाय करताना पकडली गेली अशी बातमी आली होती. तिने नंतर तसं मान्यही केल्याचं कळलं होतं. पैशांच्या अडचणींमुळे ती त्या व्यवसायाकडे वळाली. यानंतर तिला रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आलंय. मात्र जेव्हा तिला या प्रकरणात क्लीन चीट मिळाली तेव्हा तिथून सुटल्यानंतर तिने आपण हे आरोप मान्य केले नसल्याचं सांगितलं.

रेस्क्यू होममधून बाहेर आल्यानंतर श्वेताने स्टेटमेंट दिलं. ती म्हणाली, "मला ताब्यात घेतल्यानंतर सरळ रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आलं होतं. मी तिथे ५९ दिवस होते. ६० व्या दिवशी मी घरी आले. त्यामुळे मी या दरम्यान माध्यमांना कोणतंच स्टेटमेंट दिलं नव्हतं. मग मी हे आरोप मान्य केल्याचं कुठून आलं? माझ्याजवळ मोबाइलही नव्हता. मी शेवटचं फक्त माझ्या आईशी आणि काही मित्रांशी बोलले होते. त्या दोन महिन्यात माझ्याजवळ ना वर्तमानपत्र असायचे ना टेलिव्हिजन, इंटरनेट किंवा रेडिओ."


ती पुढे म्हणाली, "बाहेर नक्की माझ्याबद्दल काय बोललं जातंय याचा मला गंधही नव्हता. मुंबईत परत आल्यानंतर मला त्या २ महिन्यातील माझ्याबाबतीतील बातम्या समजल्या. ते ऐकल्यानंतर मला निराशाहून जास्त आश्चर्य वाटलं. मी हैदराबादला एका अवॉर्ड फंक्शनसाठी गेले होते. तिथून परत येताना माझी फ्लाईट चुकली  आणि अवॉर्ड फंक्शनच्या मॅनेजरनेच हॉटेल बुक केलं होतं. मी त्या हॉटेलमध्ये थांबले आणि तिथे पोलिसांनी येऊन मला अटक केली. त्या मॅनेजरलाही अटक करण्यात आली होती."

श्वेता नुकतीच त्रिभुवन मिश्रा सीए टॉपर सीरिजमध्ये दिसली. यामधील तिच्या भूमिकेचं कौतुक झालं. याशिवाय दोन वर्षांपूर्वी ती 'क्रिमिनल जस्टिस' या गाजलेल्या वेबसीरिजमध्येही झळकली. 

Web Title: Makdi fame actress Shweta Basu prasad acting journey she was trapped in a scandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.