हिंदुंना दहशतवादी म्हणणाऱ्या ‘क्वांटिको’च्या निर्मात्यांनी मागितली माफी; म्हटले ‘प्रियांकाचे याच्याशी काहीही देणे-घेणे नाही’!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2018 09:14 AM2018-06-09T09:14:57+5:302018-06-09T14:45:05+5:30
अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेच्या निर्मात्यांनी अखेर माफी मागितली आहे. एनबीसी नेटवर्क हा माफीनामा ‘क्वांटिको-३’च्या त्या एपिसोडसाठी ...
अ िनेत्री प्रियांका चोप्राच्या ‘क्वांटिको’ या अमेरिकन मालिकेच्या निर्मात्यांनी अखेर माफी मागितली आहे. एनबीसी नेटवर्क हा माफीनामा ‘क्वांटिको-३’च्या त्या एपिसोडसाठी जाहीर केला, ज्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामागे भारतीय राष्टÑवाद्यांचा हात असल्याचे एका डायलॉगमध्ये दाखविण्यात आले होते. एएनआयने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘त्या एपिसोडमुळे बºयाचशा लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करताना प्रियांका चोप्रावर निशाणा साधला जे अजिबातच योग्य नाही. कारण ती या शोची निर्माती नाही, लेखक नाही आणि दिग्दर्शकही नाही. त्यामुळे याच्याशी प्रियांकाचे काहीही देणे-घेणे नाही. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत’ अशापद्धतीने ‘क्वांटिको-३’मध्ये हिंदुंना दहशतवादी म्हणून दाखविणाºया एनबीसी नेटवर्कने आपला माफीनामा सादर केला.
ALSO READ : ‘क्वांटिको’मध्ये भारताविरोधी डायलॉग बोलणाऱ्या प्रियांका चोप्राला लोकांनी म्हटले, ‘शेम आॅन यू’!
प्रियांकाच्या ‘क्वांटिको-३’मधील द ब्लड आॅफ रोमियो या एपिसोडवरून हा संपूर्ण प्रकार समोर आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रियांकावर प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आली. प्रियांका ‘क्वांटिको’मध्ये एलेक्स पॅरिशची भूमिका साकारत आहे. ती या मालिकेत एफबीआय एजेंटच्या भूमिकेत आहे. या एपिसोडमध्ये दाखविण्यात आले होते की, ‘पाकिस्तान-भारतात शांततेची चर्चा होत आहे. परंतु त्याअगोदरच न्यू यॉर्कमध्ये परमाणू आतंकी हल्ला करण्याचा कट रचला जात आहे. जेव्हा एका व्यक्तीला आतंकी हल्ल्या करण्याच्या संशयावरून पकडले जाते, तेव्हा त्याच्याकडे एक रूद्राक्षची माळ मिळते. ज्यानंतर प्रियांका म्हणते की, ‘हा इंडियन नॅशनालिस्ट आहे, जो अशाप्रकारचा हल्ला करून पाकिस्तानला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.’ हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल होत आहे की, त्यावरून प्रियांकावर टीकेची झोड उठवली जात आहे. बºयाचशा लोकांनी तर प्रियांका देशाची छबी खराब करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे.
‘क्वांटिको’चा हा एपिसोड जूनच्या पहिल्याच तारखेला प्रदर्शित करण्यात आला. खरं तर ‘क्वांटिको-३’ला म्हणावी तशी टीआरपी मिळत नसल्याने हा शो बंद करण्याचा निर्णय निर्मात्यांकडून घेतला जात आहे. दरम्यान, आता ‘क्वांटिको’च्या निर्मात्यांनीच माफीनामा सादर केल्याने प्रियांकावर होत असलेली टीका कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

}}}} ">The episode has stirred a lot of emotion, much of which is unfairly aimed at Priyanka Chopra, who didn’t create the show, nor does she write or direct it: ABC Network's apology for Hindu terror plot in Quantico pic.twitter.com/Artb8aP1f0— ANI (@ANI) June 8, 2018
The episode has stirred a lot of emotion, much of which is unfairly aimed at Priyanka Chopra, who didn’t create the show, nor does she write or direct it: ABC Network's apology for Hindu terror plot in Quantico pic.twitter.com/Artb8aP1f0— ANI (@ANI) June 8, 2018