माला सिन्हाने सेटवर केला होता हंगामा, दिग्दर्शकाला धरलं होतं वेठीस, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 08:09 AM2023-11-11T08:09:00+5:302023-11-11T08:10:02+5:30
माला सिन्हा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही.
माला सिन्हा यांनी धुल का फूल, बहुराणी, हिमालय की गोंद में यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. हिंदी, बंगाली आणि नेपाळी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या माला सिन्हा यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. माला सिन्हा आपल्या काळातील सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. 1960 आणि 1970 च्या दशकात त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले.
आज आम्ही तुम्हाला अभिनेत्रीशी संबंधित असाच एक किस्सा सांगणार आहोत. ही घटना 1970 मध्ये रिलीज झालेल्या 'गीत' चित्रपटादरम्यान घडली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता रामानंद सागर होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्री माला सिन्हा यानी छोटीशी गोष्ट न मिळाल्याने सेटवर गोंधळ घातला होता.
माला सिन्हा यांना सेटवर शूटिंगपूर्वी नेहमी सफरचंद हवे होते आणि त्यांना काही कारणाने सफरचंद मिळाले नाही तर त्यांनी शूटिंग थांबवलं. रामानंद सागर यांच्या 'गीत' या चित्रपटाच्या सेटवर एक दिवस त्यांना सफरचंद मिळाला नाही. सफरचंद न मिळाल्याने माला सिन्हा दिवसभर त्यांच्या मेकअप रूममध्ये बसून राहिल्या आणि बाहेर आल्या नाही.
त्यांनी दिग्दर्शक आणि सर्व कलाकारांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत थांबायला लावलं, पण त्या मेकअप रूममधून बाहेर आल्या नाहीत. शेवटी जेव्हा चित्रपटाचे निर्माते रामानंद सागर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना कारण विचारले तेव्हा ते स्वतःच आश्चर्यचकित झाले.
माला सिन्हा यांनी 1946 मध्ये 'जय वैष्णो देवी' नावाच्या बंगाली चित्रपटातून बालकलाकार म्हणून पदार्पण केले. १९५४ मध्ये ‘हॅम्लेट’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत करिअरला सुरुवात केली.