घटस्फोटानंतर मलाइका अरोरा झाली आणखी बोल्ड; शेअर केला टॉपलेस फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2017 02:02 PM2017-05-28T14:02:02+5:302017-05-28T19:32:56+5:30

​काही दिवसांपूर्वीच पती अरबाज खान याच्याशी घटस्फोट घेणारी मलाइका अरोरा एकाकी जीवनाचा आनंद घेताना दिसून येत आहे.

Malaika Arora after divorce was even more bold; Shared topless photo! | घटस्फोटानंतर मलाइका अरोरा झाली आणखी बोल्ड; शेअर केला टॉपलेस फोटो!

घटस्फोटानंतर मलाइका अरोरा झाली आणखी बोल्ड; शेअर केला टॉपलेस फोटो!

googlenewsNext
ही दिवसांपूर्वीच पती अरबाज खान याच्याशी घटस्फोट घेणारी मलाइका अरोरा एकाकी जीवनाचा आनंद घेताना दिसून येत आहे. बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी ओळखली जाणारी मलाइका सुरुवातीपासूनच तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत राहिली आहे. परंतु घटस्फोटानंतर ती आणखी बोल्ड झाल्याचे दिसून येत आहे. याची झलक तिने इन्स्टाग्रामवर दाखविली असून, मलाइकाचा हा फोटो आग लावणारा आहे. मलाइकाने टॉपलेसमध्ये पोज देताना जणू काही बोल्डनेसचा नजराणाच पेश केला आहे. 

काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीमध्ये करणच्या मित्रपरिवाराने हजेरी लावली होती. त्यामध्ये मलाइकाही बघावयास मिळाली. पार्टीत तिचा लुक खूपच सेक्सी आणि बोल्ड होता. बॅकलेसमध्ये आलेल्या मलाइकावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. याच लुकमध्ये तिने असे काही फोटोशूट केले की, सोशल मीडियावर मलाइकाचीच चर्चा रंगली आहे. मलाइकाच्या या बॅकलेस फोटोमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाही दिसत आहे. 
 

काही दिवसांपूर्वीच मलाइका अरबाजपासून विभक्त झाली. दोघांनी एकमेकांच्या सल्ल्याने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता, त्यास बांद्रा कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली होती. १९९८ मध्ये विवाहाच्या बंधनात अडकलेल्या या जोडप्याने तब्बल १८ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर ११ मे २०१७ रोजी घटस्फोट घेऊन आपापल्या वाटा निवडल्या. काही वर्षांपासून मलाइका आणि अरबाजमधील संबंध फारसे चांगले नव्हते. वृत्तानुसार मलाइका तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करीत असल्याचे अरबाजला समजले होते. त्यामुळेच त्यांच्यात नेहमी या कारणावरून वाद होत होता. 

एका साप्ताहिकाला मुलाखत देताना मलाइकाने म्हटले होते की, मी अर्जुनला जवळचा मित्र समजते. आता आलेल्या माहितीनुसार मलाइका दुबईतील एका बिझनेस मॅनला डेट करीत आहे. मात्र या अफवा असल्याचे मलाइकाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, मलाइका मुलासोबत तिच्या आईकडे राहत आहे. तर अरबाज एका विदेशी मॉडेलच्या प्रेमात पडला असून, तिच्यासोबत लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Malaika Arora after divorce was even more bold; Shared topless photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.