मलायका अरोराने शेअर केला आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो; केवळ 3 तासांत साडे तीन लाखांवर लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 18:02 IST2021-02-03T17:58:06+5:302021-02-03T18:02:43+5:30

होय, मलायकाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा हॉट अवतार पाहून चाहतेही थक्क झाले.

malaika arora and ananya pandey shared her latest photoshoot to celebrate 10 years of arpita mehta | मलायका अरोराने शेअर केला आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो; केवळ 3 तासांत साडे तीन लाखांवर लाईक्स

मलायका अरोराने शेअर केला आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो; केवळ 3 तासांत साडे तीन लाखांवर लाईक्स

ठळक मुद्देमलायकाप्रमाणेच अनन्या पांडे हिनेही अर्पितासाठी फोटोशूट केले आहे.

मलायका अरोराने आजच सोशल अकाऊंटवर स्वत:चे काही हॉट फोटो शेअर केले होते आणि या हॉट फोटोंनी इंटरनेटवर नुसता धुमाकूळ घातला  होता. होय, ओव्हर साईज पांढ-या शर्टमधील तिच्या फोटोंवर चाहते अक्षरश: फिदा झाले होते. पण आता चाहते अक्षरश: खल्लास झाले आहेत. होय, मलायकाने असे काही फोटो शेअर केलेत की, तिचा हॉट अवतार पाहून चाहतेही थक्क झाले. मलायकाचा आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. डिझाईनर अर्पिता मेहताच्या ‘द मिरर’ या कॉफी टेबल बुकसाठी मलायकाने हे बोल्ड फोटोशूट केले आहे.

या फोटोत मलायका मोरपंखी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसतेय. हे फोटो पाहताच चाहत्यांनी  कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. मलायकाच्या या फोटोंना केवळ 3 तासांत साडे तीन लाख लाईक्स मिळाले आहेत. आत्तापर्यंतचा सर्वात हॉट फोटो, कडक, स्टनिंग अशा अनेक कमेंट चाहते करत आहेत.
काही तासांआधी मलायकाने व्हाईट शर्टमधील स्टनिंग फोटो शेअर केले होते. तिचे हे फोटोही क्षणात व्हायरल झाले होते. मलायका अरोरा नवीन वषार्चे सेलिब्रेशन करण्यासाठी गोव्याला गेली होती. तेव्हाही तिचे गोवा व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर असेच व्हायरल झाले होते. बिकनीतील तिच्या हॉट फोटोंना चाहत्यांची जबरदस्त पसंती मिळाली होती.  

अनन्या पांडे हिनेही केले फोटोशूट

मलायकाप्रमाणेच अनन्या पांडे हिनेही अर्पितासाठी फोटोशूट केले आहे. तिनेही मोरपंखी रंगाच्या अर्पिताने डिझाईन केलेल्या ड्रेसमध्ये ग्लॅमरस पोज दिल्या आहेत. मलायका व अनन्याची तुलना होऊ शकत नाही. पण या दोघींच्या फोटोंनी सोशल मीडियावर आग लावलीये, इतके मात्र नक्की

Web Title: malaika arora and ananya pandey shared her latest photoshoot to celebrate 10 years of arpita mehta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.