खुल्लमखुल्ला! अर्जुन कपूरच्या गाडीत दिसली मलायका अरोरा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 11:00 AM2018-12-23T11:00:09+5:302018-12-23T11:01:26+5:30
अर्जुन कपूर व मलायका अरोरा आता काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. कालपरवा पर्यंत अर्जुन व मलायका दोघेही मीडियासमोर एकत्र येणे टाळायचे. पण आता दोघेही फॅमिलीसोबत फिरताहेत.
अर्जुन कपूर व मलायका अरोरा आता काहीही लपवण्याच्या मूडमध्ये नाहीत. कालपरवा पर्यंत अर्जुन व मलायका दोघेही मीडियासमोर एकत्र येणे टाळायचे. पण आता दोघेही फॅमिलीसोबत फिरताहेत. आता फॅमिली राजी म्हटल्यावर, डर तो कुणाचा?
काल अर्जुन व मलायका एका प्री-ख्रिसमस पार्टीत दिसले. या पार्टीत अर्जुन व मलायका दोघेही एकाच गाडीतून पोहोचलेत. या गाडीत मलायका अर्जुनच्या मागच्या सीटवर दिसली. तर अर्जुन कपूर ड्राईव्ह करताना दिसला. अर्जुनच्या बाजूच्या सीटवर त्याचे काका संजय कपूर दिसले. मलायकाची अर्जुनच्या कुटुंबासोबत वाढलेली ही जवळीक बघितल्यानंतर सर्वांना कळायचे ते कळून चुकले.
मलायका व अर्जुन यांना यापूर्वी अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. पण प्रथमच अर्जुनच्या गाडीत मलायका दिसली. येत्या एप्रिलमध्ये अर्जुन व मलायका दोघेही लग्न करणार, असे मानले जात आहे. सूत्रांचे मानाल तर दोघांनीही मुंबईत एक अपार्टमेंटही खरेदी केले आहे.
अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुनसोबतचे रिलेशन उघडपणे स्वीकारले आहेत. आधी दोघेही कॅमेऱ्याांपासून लपूनछपून वावरत. पण गेल्या एक दोन महिन्यांत दोघेही जगाची पर्वा न करता एकत्र दिसत आहेत. अलीकडे ‘कॉफी विद करण 6’ या चॅट शोमध्ये बोलताना अर्जुनने अप्रत्यक्षपणे लग्नाचे संकेत दिले होते. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला होता. यावर मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला होता. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चयार्चा धक्का बसला होता. तुझ्या पार्टनरला तुझ्या कुटुंबियासोबत कधी भेटवणार, असे करणने विचारल्यावर, माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच,असे त्याने सांगितले होते. त्यावर मला आत्ता इथे ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली होते. लग्नासाठी तू तयार आहेस का,असे करणने विचारले असता पूर्वी मी लग्न या गोष्टीसाठी तयार नव्हतो. पण आता मी लग्न करायला तयार आहे, असे तो म्हणाला होता.