मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरने ब्रेकअप केलं कन्फर्म! इव्हेंटमधला व्हिडीओ पाहून चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:42 PM2024-07-27T12:42:53+5:302024-07-27T12:43:56+5:30
Malaika Arora-Arjun Kapoor : मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले तेव्हा असे वाटले की त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे आणि ते व्हॅकेशनसाठी जात आहेत. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहता, अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली आहे.
अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या चर्चेत आले आहेत. त्या दोघांचं ब्रेकअप झाल्याचे चर्चा रंगली आहे. अलिकडेच ते दोघे एअरपोर्टवर एकत्र स्पॉट झाले होते. त्यावेळी त्या दोघांचं पॅचअप झाल्याचे बोलले जात होते. मात्र त्यांचा लेटेस्ट व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून युजर्सही हैराण झाले आहेत. एका इव्हेंटमध्ये अर्जुन आणि मलायका एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसले आणि मलायका-अर्जुनचा हा व्हिडिओ पाहून युजर्स त्यांचे ब्रेकअप झाल्याचे सांगत आहेत.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर नुकतेच मुंबई विमानतळावर दिसले तेव्हा असे वाटले की त्यांच्यामध्ये सर्व काही ठीक आहे आणि ते व्हॅकेशनसाठी जात आहेत. पण आता समोर आलेला व्हिडिओ पाहता, अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या ब्रेकअपची पुष्टी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या ब्रेकअपच्या बातम्या येत होत्या आणि दोघेही सोशल मीडियावर क्रिप्टिक पोस्ट शेअर करत होते. आता ते एकमेकांकडे दुर्लक्ष करून एका फॅशन इव्हेंटमध्ये वेगळे बसलेले दिसले.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचा हा व्हिडिओ एका पापाराझीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, जो चर्चेत आहे आणि त्यावर अनेक कमेंट्सही येत आहेत. सहसा मलायका आणि अर्जुन प्रत्येक इव्हेंटमध्ये एकत्र दिसायचे आणि एकत्र बसायचे, पण या इव्हेंटमध्ये त्यांच्यामध्ये खूप अंतर होते आणि ते वेगळे बसले होते.
अर्जुनकडे दुर्लक्ष करताना दिसली मलायका
या कार्यक्रमादरम्यान अर्जुन कपूर एका चाहत्यासोबत सेल्फी घेत असताना मलायकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्यापासून दूर गेली. पण अर्जुनने त्यावेळी चांगलाच हावभाव दाखवला. तो मलायकाच्या मागे हात ठेवून गर्दीतून पुढे जाण्यास मदत करताना दिसला. मात्र मलायकाने यावर काहीही प्रतिक्रिया दिली नाही. तिने अर्जुन कपूरकडेही मागे वळून पाहिले नाही. हे सर्व पाहून युजर्सचे म्हणणे आहे की, दोघांनीही त्यांच्या ब्रेकअपच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
चाहते झाले हैराण
एका युजरने व्हिडिओवर लिहिले की, 'अखेर आता हे नाते संपले आहे.' दुसऱ्या युजरने 'हे होणारच होते' अशी टिप्पणी केली. आणखी एकाने लिहिले की, 'याचा अर्थ ब्रेकअप आहे.' काही चाहते त्यांच्या बचावासाठी आले आणि एका चाहत्याने लिहिले की आपण लोकांना जज करणे बंद केले पाहिजे. अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे ज्यामुळे त्यांना कंफर्टेबल वाटेल.