मलायका-अर्जुन कपूरचा लवकरच होणार साखरपुडा? भारताबाहेर रंगणार सोहळा, 'त्या' ट्विटने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 12:46 PM2023-02-21T12:46:24+5:302023-02-21T12:52:18+5:30
बॉलिवूडमधले लव्हबर्डस अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
बॉलिवूडमधले लव्हबर्डस अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगत असते. अनेक वर्ष नातं लपवून ठेवल्यानंतर गेल्यावर्षी दोघांनी सोशल मीडियावरही नात्याची कबूली दिली होती. कितीही टीका झाली तरी त्यांचं हे रिलेशनशिर टिकून राहिलं आहे. मात्र हे दोघे लग्न कधी करणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता त्याचंही उत्तर मिळालं आहे. मलायका-अर्जुन पुढच्या आठवड्यात साखरपुडा करणार असल्याचं ट्वीट फिल्म क्रिटिक उमैर संधू याने केलं आहे.
मलायका-अर्जुनने आता खुलेआम एकमेकांवरील प्रेम मान्य केलं आहे. दोघेही सोबत व्हॅकेशन एंजॉय करताना दिसतात तर कधी एकमेकांसोबतचे रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मलायका अर्जुनपेक्षा तब्बल १२ वर्षांनी मोठी आहे. पण प्रेमाला वय नसतं ते हेच. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघेही आता साखरपुडा उरकणार असल्याची चर्चा आहे. फिल्म क्रिटिक उमैर संधू यांनी ट्वीट केले की, 'ब्रेकिंग न्यूज!मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचा पुढील आठवड्यात पॅरिसमध्ये साखरपुडा होणार.'
Breaking news: #MalaikaArora & #ArjunKapoor will get engaged next week in Paris !!! pic.twitter.com/jBOY0bJ0OA
— Umair Sandhu (@UmairSandu) February 20, 2023
उमैर संधू यांच्या या ट्वीटनंतर बीटाऊनमध्ये चर्चेला उधाण आले आहे. 'सिटी ऑफ लव्ह' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पॅरिस मध्ये हा साखरपुडा पार पडेल असं ट्विट मध्ये लिहिलं आहे. दोघांचेही पॅरिस फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. त्यामुळे आता या साखरपुड्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. या सोहळ्यासाठी काही मोजक्या लोकांनाच आमंत्रण असणार आहे. तर मार्च मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकतील अशी देखील चर्चा आहे. अर्थात अद्याप दोघांकडूनही याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
मलायका १९९८ मध्ये अरबाज खानसह विवाहबंधनात अडकली होती. दोघांना अरहान हा २० वर्षांचा मुलगा आहे. लग्नाच्या १९ वर्षांनंतर मलायका आणि अरबाज विभक्त झाले. आज दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.