Malaika Arora आणि Arjun Kapoor लवकरच बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्रीनं दिली 'ही' हिंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 12:10 PM2022-11-10T12:10:04+5:302022-11-10T12:10:30+5:30
Malaika Arora and Arjun Kapoor : मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.
बॉलिवूडमधील चर्चित कपल्सपैकी एक कपल म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor). मलायका आणि अर्जुन लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. खरेतर, अभिनेत्री मलायका अरोराने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यानंतर तिच्या पोस्टवर लोकांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मलायका अरोराने इंस्टाग्रामवर नुकतेच लाजतानाचा फोटो शेअर करत लिहिले की, मी होकार दिला. मलायकाची ही पोस्ट पाहून चाहते हैराण झाले आहेत. ते तर्कवितर्क लावताना दिसत आहेत. खरंच मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची हिंट अभिनेत्रीनं दिली आहे की प्रमोशनल स्ट्रॅटेजी आहे. कारण यापूर्वीही काही कलाकारांनी या गोष्टींचा आगामी प्रोजेक्टच्या प्रमोशन्ससाठी वापर केला आहे.
कॉफी विद करणमध्ये अर्जुन कपूरने बहिण सोनम कपूर सोबत हजेरी लावली होती. त्यावेळी अर्जुनला लग्नाबद्दल विचारलं असताना त्याने काहीच उत्तर दिले नव्हते. मात्र अर्जुन मलायका त्याच्या आयुष्यात आल्यामुळे त्याच्यात खूप पॉझिटिव्ह बदल झाल्याचे मानतो.
अर्जुन कपूर, मलायका अरोरासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. अर्जुन कपूर स्वतःपेक्षा १२ वर्षांपेक्षा मोठ्या मलायकाला डेट करतो आहे आणि दोघे खुल्लमखुल्ला प्रेम व्यक्त करताना दिसतात. सुरूवातीला अर्जुन कपूर आणि मलायका अरोराने नाते लपवून ठेवले होते. मात्र २०१९ मध्ये अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी दोघांनी रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते दोघे एकत्र व्हॅकेशनला जातात आणि एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.