VIDEO : मलायका अरोरा आणि हरनाज संधूने 'छैय्या छैय्या' गाण्यावर केला डान्स, बघा कुणी मारली बाजी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:50 PM2022-04-02T17:50:58+5:302022-04-02T17:54:35+5:30
Harnaaz Sandhu and Malaika Arora Dance : एका शोमध्ये मलायका अरोरा आणि हरनाज संधू एकत्र आल्या होत्या. यावेळी मलायका अरोरासोबत हरनाजने डान्स केला.
मिस यूनिव्हर्स हरनाज संधू (Harnaaz Sandhu) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. मिस यूनिव्हर्सचा किताब मिळवल्यानंतर केवळ तीन महिन्यात हरनाजचं वजन वाढलं. त्यामुळे ती ट्रोल झाली होती. पण नंतर तिने स्पष्ट केलं की, एका आजारामुळे तिचं वजन वाढलं. अशात तिचा एका व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती छैय्या छैय्या गाण्यावर मलायका अरोरासोबत (Malaika Arora) डान्स करताना दिसत आहे.
एका शोमध्ये मलायका अरोरा आणि हरनाज संधू एकत्र आल्या होत्या. यावेळी मलायका अरोरासोबत हरनाजने डान्स केला. हरनाज मलायकाच्या डान्ससोबत मॅच करण्याचा पूर्ण प्रयत्न करते. तसा हरनाजचा हा प्रयत्न चांगला होता. हरनाज आणि मलायकाचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ब्लॅक बॉडी फिट लॉंग ड्रेसमध्ये मलायका कमालीची सुंदर दिसत होती तर हरनाजही ग्लॅमरस दिसत होती. हा व्हिडीओ शेअर केल्यावर दोघींचं अनेकांनी कौतुक केलं तर काही लोकांना हरनाजला ट्रोलही केलं. ती काही दिवसांपासून वाढत्या वजनामुळे ट्रोल होत आहे.
कोणता आजार आहे हरनाजला?
हरनाजने अनेकदा ट्रोलर्सचं तोंड बंद केलं आहे. ती म्हणाली की, लोकांच्या अशा कमेंट्सने तिला काही फरक पडत नाही. हरनाज म्हणाली की, ती तिच्या बॉडीच्या कोणत्याही शेपने खूश आहे. हरनाजला Celiac नावाचा आजार आहे. ज्यामुळे वजन वाढतं. सर्वात महत्वाची बाब ही आहे की, हरनाज आपल्या वाढत्या वजनाबाबत आणि बॉडी ट्रान्सफॉर्मेशनबाबत पॉझिटिव्ह आहे.