मलायकाच्या आयकॉनिक गाण्यावर अर्जुन कपूरने केला लेडी लव्हसोबत जबरदस्त डान्स, दोघांच्या केमिस्ट्रीची रंगलीय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 11:30 AM2022-08-27T11:30:57+5:302022-08-27T11:36:46+5:30

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक असलेल्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यामध्ये दोघे 'छैय्या छैय्या' गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत.

Malaika Arora Arjun kapoor groove to chaiyya chaiyya song at kunal rawal pre wedding bash video viral | मलायकाच्या आयकॉनिक गाण्यावर अर्जुन कपूरने केला लेडी लव्हसोबत जबरदस्त डान्स, दोघांच्या केमिस्ट्रीची रंगलीय चर्चा

मलायकाच्या आयकॉनिक गाण्यावर अर्जुन कपूरने केला लेडी लव्हसोबत जबरदस्त डान्स, दोघांच्या केमिस्ट्रीची रंगलीय चर्चा

googlenewsNext

Kunal Rawal's Pre-Wedding Bash:अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे इंडस्ट्रीतील स्टार कपलपैकी एक आहेत. दोघेही  एकमेकांना दीर्घकाळापासून डेट करत आहेत. त्यांचे चाहते या दोघांच्या लग्नाची वाट बऱ्याच दिवसांपासून आतुरतेने पाहत आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले आहेत. आता या दोघांचा डान्स करतानाच एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होतो आहे.

प्रसिद्ध फॅशन डिझायनर कुणार रावल आणि अर्पिता मेहता यांच्या प्री-वेडिंग पार्टी ठेवली होती. अनेको सेलिब्रेटींनी या पार्टीत हजेरी लावली होती. यात मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरही होते, ज्यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा झाली. सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये मलायका तिच्या 'छैय्या छैय्या' (Chaiyya Chaiyya)या आयकॉनिक गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

1998 मध्ये आलेल्या 'दिल से' चित्रपटातील मलायकाचा हा एकमेव आयटम नंबर होता, ज्यामुळे ती घराघरात पोहोचली. कुणार रावल आणि अर्पिता मेहताच्या पार्टीत डान्स करताना याच गाण्यावर तिला अर्जुन कपूरची साथ मिळाली. या पार्टीत मलायका-अर्जुन व्यतिरिक्त वरुण धवन, जान्हवी कपूर, शनाया कपूर आणि इतर अनेक स्टार्सनीही हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुणाल आणि अर्पिता 28 ऑगस्ट 2022 रोजी मुंबईतील ताजमहाल पॅलेसमध्ये लग्न करणार आहेत. 
 

Web Title: Malaika Arora Arjun kapoor groove to chaiyya chaiyya song at kunal rawal pre wedding bash video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.