अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 12:35 PM2021-11-12T12:35:58+5:302021-11-12T12:36:32+5:30

Arbaaz khan: मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. या सगळ्यामध्ये अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर व्यक्त झाला आहे.

malaika arora arjun kapoor wedding arbaaz khan epic reply to reporter on their marriage | अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला...

अर्जुन-मलायकाच्या लग्नावर अरबाजची प्रतिक्रिया; म्हणाला...

googlenewsNext

एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेता अरबाज खान (arbaaz khan) आणि मलायका अरोरा (malaika arora) यांच्याकडे पाहिलं जायचं. १९९८ साली लग्नगाठ बांधलेल्या या जोडीने २०१७ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. आज या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या असून ते त्यांच्या आयुष्यात पुढे मार्गस्थ झाले आहेत. मलायका अभिनेता अर्जुन कपूरला (arjun kapoor) डेट करत आहे. तर, अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियानी हिला डेट करत आहे. विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये अरबाजची एक मुलाखत चर्चेत आली आहे. अरबाज पहिल्यांदाच मलायका- अर्जुनच्या नात्यावर व्यक्त झाला आहे.

मलायका आणि अर्जुन यांचं नात आता कोणापासूनही लपलेलं नाही. अनेकदा ही जोडी प्रसारमाध्यमांसमोर खुलेपणाने वावरत असते. त्यामुळे मलायका-अर्जुन लग्न कधी करणार हा प्रश्न चाहते विचारतांना दिसतात. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर अनेकदा मलायकाने तिच्या नातेसंबंधांवर भाष्य केलं होतं. परंतु, अरबाजने पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

मलायकाच्या आईसोबत आहे अरबाजचं स्ट्राँग रिलेशन; 'हा' व्हिडीओ ठरतोय चर्चेत

'पिंच इन मुंबई'च्या लाँचिंगवेळी अरबाजला मुद्दाम मलायका- अर्जुनच्या लग्नाविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, अरबाजने यावर शिताफीने उत्तर देत भाष्य करणं टाळलं.  "पापाजी, फार विचारपूर्वक प्रश्न विचारला आहे. नक्कीच हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही रात्रभर विचार केला असेल. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं मला भाग आहे", असं अरबाज म्हणाला.

'मलायकापासून विभक्त होणं गरजेचं होतं, कारण..'; अरबाज खानने केला मोठा खुलासा

पुढे तो म्हणतो, "पण आता हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही इतका विचार केला आहे. तर, सहाजिकच मलादेखील विचार करायला थोडा वेळ द्या. मी उद्या या प्रश्नाचं उत्तर दिलं तर चालेल?"

दरम्यान, अरबाजने दिलेलं हे उत्तर ऐकून त्याने वेळ मारुन नेल्याचं पाहायला मिळालं. परंतु, मलायका आणि अर्जुन यांच्या लग्नाच्या दररोज चाहत्यांमध्ये चर्चा रंगत असतात. एका मुलाखतीतही मलायकाने तिच्या वेडिंग प्लॅनविषयी भाष्य केलं होतं. त्यामुळे या लग्नाच्या चर्चांना चांगलाच जोर आला आहे.
 

Web Title: malaika arora arjun kapoor wedding arbaaz khan epic reply to reporter on their marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.