मलायका अरोराने बहिणीवर केला हा आरोप, शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 10:54 AM2019-07-26T10:54:11+5:302019-07-26T11:05:07+5:30

मलायका अरोरा चित्रपटात भलेही ना दिसो, पण चर्चेत राहणे तिला मात्र चांगलेच जमते. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आहे. अगदी अलीकडे स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करून ती चर्चेत आली. सध्या बहीणीवर केलेल्या आरोपामुळे ती चर्चेत आहे.

malaika arora asked sister amrita arora if she is copying her | मलायका अरोराने बहिणीवर केला हा आरोप, शेअर केला फोटो

मलायका अरोराने बहिणीवर केला हा आरोप, शेअर केला फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देमलायका अरोराची बहीण अमृता अरोराने कितने दूर कितने पास या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली.

मलायका अरोरा चित्रपटात भलेही ना दिसो, पण चर्चेत राहणे तिला मात्र चांगलेच जमते. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत आहे. अगदी अलीकडे स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करून ती चर्चेत आली. सध्या बहीणीवर केलेल्या आरोपामुळे ती चर्चेत आहे. होय, मलायकाने बहीण अमृता अरोरा हिच्यावर जाहीर आरोप केला आहे. तिच्या या आरोपाने चाहतेही चक्रावले आहेत.
आता हा आरोप कुठला तर कॉपी करण्याचा. होय, मलायकाने अमृतावर कॉपी करण्याचा आरोप केला आहे. मलायकाने स्वत:च्या इन्स्टाग्राम स्थोरीवर एक कोलाज फोटो शेअर केला आहे. यात एकीकडे मलायका तिच्या जिम आऊटफिटमध्ये मीडियाला पोज देताना दिसतेय. तर दुसरीकडे अमृताही अगदी मलायकासारख्या पोजमध्ये उभी आहे.

‘अमृता अरोरा काय तू माझी पोज कॉपी करत आहेस?’, असे तिने या फोटोवर लिहिले आहे. अर्थात हा सगळा गमतीगमतीचा मामला आहे. त्यामुळे मलायकाचा हा आरोप फार गंभीरपणे घेण्याची गरज नाही, हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल.

मलायका अरोराची बहीण अमृता अरोराने कितने दूर कितने पास या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील करियरला सुरुवात केली. यानंतर तिने आवारा पागल दीवाना, हॅलो, गोलमाल रिटर्न्स यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ हा तिचा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. पण त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात झळकली नाही. अमृताला बॉलिवूडमध्ये तितकेसे यश मिळाले नसल्याने तिने अभिनयक्षेत्रापासून दूर राहाणेच पसंत केले. अमृता चित्रपटात काम करत नसली तरी सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. 

मलायकाने काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा आपल्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. मलायकाने अर्जुन कपूरचे नाव न घेता सांगितले होते की, हे खूप अद्भूत आहे. जेव्हा माझे लग्न तुटले तेव्हा मी पुन्हा कोणत्या रिलेशनशिपमध्ये पडेन, असे मला वाटले नव्हते. मी नात्यात पडले तर माझं मन पुन्हा दुखावेल, ही भीती माज्या मनात होती. पण खरे सांगू तर मला एक रिलेशनशीप हवे होते आणि मला ते मिळाले. मी आता खूप खूश आहे. 

Web Title: malaika arora asked sister amrita arora if she is copying her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.