Malaika Arora Birthday: तुम बस मेरी रहना..., ‘लेडी लव्ह’ मलायकासाठी अर्जुन कपूरची रोमॅन्टिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:11 AM2022-10-23T11:11:37+5:302022-10-23T11:12:07+5:30

Malaika Arora Birthday: डार्लिंग अर्जुन कपूरने अशा काही खास शुभेच्छा दिल्यात की, मलायकाचा वाढदिवस एकदम स्पेशल झाला. होय, आपल्या लेडी लव्हला अर्जुनने रोमॅन्टिक शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली आहे..

Malaika Arora Birthday: boyfriend arjun kapoor romantic post | Malaika Arora Birthday: तुम बस मेरी रहना..., ‘लेडी लव्ह’ मलायकासाठी अर्जुन कपूरची रोमॅन्टिक पोस्ट

Malaika Arora Birthday: तुम बस मेरी रहना..., ‘लेडी लव्ह’ मलायकासाठी अर्जुन कपूरची रोमॅन्टिक पोस्ट

googlenewsNext

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora )आज तिचा 49 वा वाढदिवस साजरा करतेय. मलायकाचा वाढदिवस म्हटल्यावर अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) शुभेच्छा आल्याच. डार्लिंग अर्जुन कपूरने अशा काही खास शुभेच्छा दिल्यात की, मलायकाचा वाढदिवस एकदम स्पेशल झाला. होय, आपल्या लेडी लव्हला अर्जुनने रोमॅन्टिक शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली.

अर्जुनने आपल्या स्वीटहार्ट मलायकासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत मलायका स्वत:ला आरशात बघतेय आणि अर्जुन मलायकाला प्रेमाने न्याहाळताना दिसतोय. हा फोटो रोमॅन्टिक आहेख. पण या फोटोसोबत अर्जुनने मलायकासाठी लिहिलेला संदेश त्यापेक्षा रोमॅन्टिक आहे. ‘द यिन टू माय मांग... हॅपी बर्थ डे बेबी... तू जशी आहेस तशीच राहा... आनंदी राहा आणि नेहमी माझी बनून राहा...,’असं कॅप्शन अर्जुनने या फोटोला दिलं आहे.

मलायका व अर्जुन बी-टाऊनच्या सर्वाधिक रोमॅन्टिक कपलपैकी एक आहे. जेव्हापासून दोघांनी आपलं नातं ऑफिशिअल केलं आहे, तेव्हापासून दोघंही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अगदी व्हॅकेशनपासून बॉलिवूडच्या पार्ट्यांपर्यंत सर्वत्र हे कपल एकमेकांचा हातात हात घालून दिसतं. हे कपल लवकरच लग्न करणार, असं मानलं जात आहेत. पण कधी? हे मात्र अर्जुन व मलायकालाच ठाऊक..

मलायका अरोराकडे पाहून कोणीच म्हणणार नाही की, 49 वर्षांची मलायका आहे. मलायका ग्लॅमरस लूकमध्ये नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करते. मलायकाची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. मलायका आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो शेअर करते.  मलायकाची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे. मलायका आपल्या चाहत्यांसाठी कायमच फोटो शेअर करते. जे चाहत्यांना देखील प्रचंड आवडतात. ‘मुन्नी बदनाम हुइ’ हे मलायकाचं आयटम सॉंग हीट ठरलं. मलायका एक उत्तम डान्सर असून तिने अनेक चित्रपटांमधील गाण्यावर डान्स केले आहेत. मलायका अरोराची एकूण संपत्ती 80 कोटींची आहे. इतकेच नव्हे तर एक आलिशान घर देखील मलायकाकडे आहे.  

Web Title: Malaika Arora Birthday: boyfriend arjun kapoor romantic post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.