चर्चा तर होणारच! 'त्या' बोल्ड फोटोशूटमुळे मलायकाच्या अंडरआर्म्सवर खिळली होती सर्वांची नजर, 'तो' जुना फोटो व्हायरल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 13:09 IST2020-07-17T12:32:55+5:302020-07-17T13:09:31+5:30
आपल्या जबरदस्त फॅशन सेन्सने चाहत्यांना घायाळ करणारी मलाइका ड्रेसेसपासून ते नेलपॉलिश, मेनीक्योर-पेडीक्योर सगळ्यांचीच विशेष काळजी घेते.

चर्चा तर होणारच! 'त्या' बोल्ड फोटोशूटमुळे मलायकाच्या अंडरआर्म्सवर खिळली होती सर्वांची नजर, 'तो' जुना फोटो व्हायरल...
बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत राहणारी ग्लॅमगर्ल मलाइका अरोरा ही कदाचित ही पहिली अशी भारतीय मॉडल असेल जिने अंडरआर्ममधील केस शेव्ह न करता फोटो तसाच पोस्ट केला होता. तुम्हाला धक्का बसला ना? आम्हालाही असात धक्का बसले जेव्हा आम्ही तिचा एक बोल्ड फोटो पाहिला.
आपल्या जबरदस्त फॅशन सेन्सने चाहत्यांना घायाळ करणारी मलाइका ड्रेसेसपासून ते नेलपॉलिश, मेनीक्योर-पेडीक्योर सगळ्यांचीच विशेष काळजी घेते. पण चक्क अंडरआर्म्सबाबत तिने इतकी घाई कशी केली? हे तर काही आम्हालाही समजलं नाही.
खरंतर हा फोटो जुना आहे. मलाइकाने GQ मॅगझिनसाठी फोटोशूट केलं होतं. यावेळी तिने हॉट बॉडीसूट घालून हॉट फिगर फ्लॉन्ट केलं होतं. मलाइका या फोटोशूटसाठी एकापाठी एक अनेक फोटो काढले होते. ज्यात तिच्या काखेतील केस स्पष्ट दिसत आहेत.
आश्चर्यजनक बाब म्हणजे तिने उचललेलं हे पाउल मुद्दामहून उचलल्याचं दिसतं. पण ट्रोलर्सना काय फक्त संधी हवी असते. काही लोकांनी तिच्या या फोटोचं कौतुक केलंय तर काहींना यावर टीका केली. आता मलाइका ट्रोल होणं हे काही पहिल्यांदा होत नाहीये. याआधीही ती बोल्ड फोटोजमुळे ती ट्रोल झाली आहे.
सध्या भारतात सोशल मीडियावर ट्रोल करणं हा एक ट्रेन्डच झाला आहे. आता लोक काय म्हणतात याचा विचार करून बोल्ड फोटो पोस्ट करणं बंद करेल ती मलाइका कुठली? ती तर फोटोंच्या माध्यमातून नेहमी चर्चेत राहते आणि हेच तिचं काम आहे.