अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायकाच्या 'त्या' पोस्टची चर्चा, म्हणते, "मी आभारी आहे की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 15:06 IST2023-12-29T15:06:11+5:302023-12-29T15:06:48+5:30
अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर आता मलायकाच्याही दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच मलायकाच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नानंतर मलायकाच्या 'त्या' पोस्टची चर्चा, म्हणते, "मी आभारी आहे की..."
बॉलिवूड अभिनेता अरबाज खानने नुकतंच दुसरं लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खान हिच्याशी वयाच्या ५६व्या वर्षी निकाह केला. अगदी साध्या पद्धतीने आणि मोजक्या पाहुणे मंडळीच्या उपस्थितीत अरबाज आणि शूराने लग्नगाठ बांधली. अरबाजच्या दुसऱ्या लग्नानंतर आता मलायकाच्याही दुसऱ्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच मलायकाच्या एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अरबाजच्या लग्नानंतर मलायकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने "मी सकाळी उठले. माझ्याकडे घालायला कपडे आहेत. माझ्याकडे पाणी आहे. माझ्याकडे खायला अन्न आहे. मी आभारी आहे," असं म्हटलं आहे. मलायकाच्या या पोस्टची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
अरबाज खानने मलायकाशी १९९८ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर जवळपास १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेत ते वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. मलायकाशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज मॉडेल जॉर्जिया एंड्रियाला डेट करत होता. त्यानंतर त्याने काहीच दिवसांपूर्वी शूराशी निकाह करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच दिला. सध्या मलायका अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.