VIDEO : मलायकाचा अर्जुन कपूरच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, अंदाज पाहून व्हाल घायाळ....
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 16:13 IST2020-11-21T16:03:24+5:302020-11-21T16:13:15+5:30
मलायकाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मलायका पुनीत पाठक आणि सलमान खानसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे.

VIDEO : मलायकाचा अर्जुन कपूरच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, अंदाज पाहून व्हाल घायाळ....
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव दिसते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. सध्या तरी मलायका मित्र मेत्रीणींसोबत धर्मशाला येथे सुट्टी एन्जॉय करत आहे. अशात तिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात मलायका पुनीत पाठक आणि सलमान खानसोबत स्टेजवर परफॉर्म करताना दिसत आहे.
व्हिडीओत मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या 'हुआ छोकरा जवान' या गाण्यावर धमाकेदार परफॉर्म करताना दिसत आहे. या गाण्यावर डान्स करतानाचा मलायकाचा खास अंदाज बघायला मिळतोय. हा डान्स पाहून मलायकाचे फॅन्स खूश झाले आहेत. या व्हिडीओला भरभरून लाइक्स आणि कमेंट मिळत आहेत.
मलायका अरोरा सध्या इंडियाज बेस्ट डान्सर शो मध्ये जज म्हणून दिसते. ती शोमध्ये केवळ जजच नाही तर स्वत:ही अनेकदा परफॉर्म करते. तिच्या डान्ससोबतच तिची स्टाइल आणि लूक्सही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. आपल्या स्टाइलबाबत मलायका बॉलिवूडची मोस्ट ग्ल्रॅमरस आणि स्टायलिश अभिनेत्रींमध्ये गणली जाते. सोबतच ती अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळेही नेहमी चर्चेत राहते.