हा शब्द ऐकल्यावर मलायका अरोराच्या तळपायाची आग जाते मस्तकात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 20:10 IST2019-05-02T20:10:00+5:302019-05-02T20:10:00+5:30
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेमुळे चर्चेत आहे.

हा शब्द ऐकल्यावर मलायका अरोराच्या तळपायाची आग जाते मस्तकात
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेमुळे चर्चेत आहे. ते दोघे लवकरच लग्न करणार असल्याचेही बोलले जात आहे. मात्र अद्याप त्या दोघांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. मात्र आता मलायका एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने आयटम हा शब्द ऐकला की तिला खूप राग येत असल्याचे सांगितले.
खरेतर मलायका अरोरा म्हटले की डोळ्यासमोर येतात तिने जबरदस्त डान्स केलेली गाणी. ती अभिनयापेक्षा तिच्या डान्ससाठी जास्त ओळखली जाते. तिने छय्या छय्या, मुन्नी बदनाम हुई यांसारख्या गाण्यांवर थिरकून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. या गाण्यांना आयटम साँग असे बोलले जाते. मात्र मलायकाला आयटम हा शब्दच रुचत नाही.
मलायकाने एका मुलाखतीत सांगितले की, ‘मला अभिनय आधीपासूनच आवडत नाही. पण डान्स सर्वांत प्रिय आहे. मी कोणत्याही गाण्यावर माझ्यावर मर्जीने नाचते. आतापर्यंत कधीच कोणी मला जबरदस्ती केली नाही. गाण्यांची निवडसुद्धा मी विचारपूर्वक करते. जर या सगळ्यांत मला काही आक्षेपार्ह वाटले तर मी त्याबद्दल बोलते. माझे मत व्यक्त करते.
मला आयटम साँग हा शब्द कधीच आवडला नाही. एखादा व्यक्ती जर मला ‘काय आयटम आहे ही,’ असं म्हणत असेल तर मी थेट त्याच्या थोबाडीतच मारेन.
मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चेशिवाय बोल्ड व बिकनीतील फोटोंमुळे देखील चर्चेत असते.