OMG! मलायका अरोराने शेअर केलेला योगा व्हिडीओ पाहून अर्जुनच्या काकांनी केली कमेंट! पाहा व्हिडीओ!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:12 AM2019-11-26T10:12:48+5:302019-11-26T10:14:04+5:30
मलायकाच्या प्रत्येक फोटो व व्हिडीओवर अर्जुन कपूरची कमेंट अपेक्षित असते. पण यावेळी मलायकाच्या या हॉट व्हिडीओवर अर्जुन नाही तर त्याच्या काकांनी कमेंट केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने सोशल मीडियावर पोस्ट केली अन् ती व्हायरल झाली नाही, हे शक्यच नाही. सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असलेली मलायका रोज नवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आहे. होय, मलायकाने एक योगा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात मलायका एक कठीण आसन करताना दिसतेय. खरे तर मलायकाच्या प्रत्येक फोटो व व्हिडीओवर अर्जुन कपूरची कमेंट अपेक्षित असते. पण यावेळी मलायकाच्या या हॉट व्हिडीओवर अर्जुन नाही तर त्याच्या काकांनी कमेंट केली आहे. होय, अभिनेते संजय कपूर मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकले नाहीत.
‘हे जग अनेक आव्हानांना कवेत घेतलेली एक सुंदर जागा आहे. आपला प्रवास आपल्याला बदलून टाकतो. फक्त एक गोष्ट बदलत नाही ती म्हणजे आपल्याला गरजेची असलेली ताकद. जमेल त्या ठिकाणी झुकायला शिकले पाहिजे. ज्यामुळे तुटून पडण्याची वेळ क्वचित येईल,’ असा सुंदर मॅसेज या व्हिडीओसोबत मलायकने दिला आहे. मलायकाचा हा व्हिडीओ आणि तिने दिलेला मॅसेज वाचून संजय कपूर भारावले आणि ‘वाह’ अशी कमेंट त्यांनी दिली.
कोरिओग्राफर व डायरेक्टर फराह खान हिनेही या व्हिडीओवर कमेंट दिली. ‘ओह माय गॉड कमिनी,’ असे तिने लिहिले.
मलायकाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. वयाच्या 45 व्या वषीर्ही फिटनेसच्या बाबतीत सर्वात पुढे असणारी अभिनेत्री म्हणून तिचे नाव घेतले जाते. या व्हिडीओवरून याचा अंदाज तुम्हाला आला असेलच.
सध्या मलायका अर्जुन कपूरला डेट करतेय. हे कपल लवकरच लग्न करणार असे मानले जात आहे. अर्जुनच्या कुटुंबानेही मलायकाला स्वीकारले आहे. काकांच्या कमेंटवरून याचाही अंदाज आला असेलच.