५० वर्षीय मलायकाचं थक्क करणारं वर्कआऊट, भल्याभल्यांना जमणार नाही, बघुनच घाम फुटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:43 AM2024-08-30T11:43:50+5:302024-08-30T11:44:47+5:30
५०व्या वर्षीही मलायका एवढी फिट कशी? या व्हिडिओत दडलंय सीक्रेट, तुम्हाला जमेल का असं वर्कआऊट?
मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बॉलिवूडच्या आयटम साँगमध्ये दिसणारी मलायका आजही प्रेक्षकांना घायाळ करून सोडते. मलायका अभिनय आणि डान्सबरोबरच तिच्या फिटनेससाठी ओळखली जाते. ५०च्या उंबरठ्यावर असलेल्या मलायकाने या वयातही तिचा फिटनेस चांगला ठेवला आहे. यासाठी ती नियमित व्यायाम करते. तिचे जीममधील अनेक व्हिडिओही व्हायरल होत असतात.
मलायका तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. यासाठी ती जीम आणि योगाचा सातत्याने अभ्यास करताना दिसते. सध्या मलायकाचा असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत ५० वर्षांची मलायका थक्क करणारं आणि सगळ्यात कठीण वर्कआऊट करताना दिसत आहे. मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती हात आणि पायाचे वर्कआऊट करताना दिसत आहे. मलायकाचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी मलायकाचं कौतुक केलं आहे.
दरम्यान, मलायका तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. अरबाज खानशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण, त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. पण, अद्याप याबाबत मलायका किंवा अर्जुनने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अर्जुनबरोबर ब्रेकअपनंतर मलायकाला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.