Malaika Arora Health Update: अपघातानंतर कशी आहे मलायका अरोराची प्रकृती? बहिण अमृताने दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2022 10:48 AM2022-04-03T10:48:51+5:302022-04-03T10:50:14+5:30

Malaika Arora Health Update: काल 2 एप्रिलला पुण्यात एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी मलायका घरून निघाली होती. यादरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात तिच्या गाडीला अपघात झाला होता.

Malaika Arora is fine and stable after car accident, sister Amrita shares update | Malaika Arora Health Update: अपघातानंतर कशी आहे मलायका अरोराची प्रकृती? बहिण अमृताने दिली माहिती

Malaika Arora Health Update: अपघातानंतर कशी आहे मलायका अरोराची प्रकृती? बहिण अमृताने दिली माहिती

googlenewsNext

Malaika Arora Car Accident : काल 2 एप्रिलला अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora ) गाडीला अपघात झाल्याची बातमी आली आणि चाहत्यांना धक्का बसला. पुण्यात एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी मलायका घरून निघाली होती. यादरम्यान मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर खोपोलीनजीक बोरघाटात तिच्या गाडीला अपघात झाला होता. अपघातानंतर मलायकाला तातडीने अपोलो रूग्णालयात भरती करण्यात आलं. सध्या मलायकाची प्रकृती कशी आहे? तर तिची बहिण अमृता अरोरा (Amrita arora) हिने याबद्दल माहिती दिली आहे.

‘इंडिया टुडे’शी बोलताना अमृताने मलायकाचं हेल्थ अपडेट दिलं. मलायकाची प्रकृती आता आधीपेक्षा बरी आहे. तिच्या प्रकृतीत वेगाने सुधार होतं आहे. काही वेळ तिला अंडर ऑब्जर्वेशन ठेवण्यात येणार आहे, असं अमृता म्हणाली. अमृताच्या एका जवळच्या मित्राने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीनुसार, मलायकाच्या डोक्याला टाके पडले आहेत. मात्र ती धोक्याबाहेर आहे. अपघातानंतर ती शॉकमध्ये गेली होती. अपघात झाला त्यावेळी तिने डोक्याजवळ कुशन होतं. त्यामुळे तिला फार मोठी इजा झाली नाही. ती थोडक्यात बचावली.
त्याआधी अपोलो हॉस्पिटलनं देखील मलायकाच्या हेल्थबाबत अपडेट दिली होती.  मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सीटी स्कॅन केल्यानंतर सर्व ठिक झालं. रात्रभर तिला अंडर ऑब्जर्वेशनमध्ये ठेवण्यात आलं. लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल,असं हॉस्पिटलने स्पष्ट केलं होतं. 

बोरघाटात पाच-सहा वाहनं एकमेकांना धडकली. यात मलायका अरोराच्या कारचादेखील समावेश होता. यानंतर मलायका अरोराला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातात मलायकाच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Web Title: Malaika Arora is fine and stable after car accident, sister Amrita shares update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.