Malaika Arora आहे सिंगल, राहुल विजयसोबत जोडलं गेलं होतं नाव, अभिनेत्रीच्या जवळचा व्यक्ती म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 10:35 AM2024-12-11T10:35:38+5:302024-12-11T10:36:37+5:30
Malaika Arora : अभिनेत्री मलायका अरोराचे अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाले आहे. त्यानंतर अभिनेत्री नाव राहुल विजयसोबत जोडले गेले होते.
अभिनेत्री मलायका अरोरा(Malaika Arora)ने याच वर्षी २०२४ मध्ये अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबत ब्रेकअप केले होते. या दोघांनीही हे मान्य केले आहे. मात्र अभिनेत्री एका मिस्ट्री मॅनसोबत अनेक वेळा दिसली. कधी सुट्टीत तर कधी एकत्र पार्टी करताना. ज्यानंतर लोक तो तिचा नवीन बॉयफ्रेंड असल्याचे म्हणू लागले. त्या मिस्ट्री मॅनचे नाव राहुल विजय असल्याचे सांगण्यात येत आहे.
मलायका अरोराचे नाव तिचा स्टायलिस्ट राहुल विजयसोबत बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. मात्र, अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल सांगितले. तो व्यक्ती म्हणाला की, मलायकाच्या आयुष्यात सध्या कोणीही नाही. 'कृपया तुमचे तथ्य तपासा. ती सिंगल आहे आणि खूप आनंदी आहे. राहुल विजय हा मलायकाचा मुलगा अरहानचा स्टायलिस्ट आहे आणि म्हणून तिचा मित्रही आहेत. इथेच प्रकरण संपते. ही अफवा पूर्णपणे मूर्ख आणि विचित्र आहे.
मलायका अरोरा आणि राहुल विजयच्या अफेअरची चर्चा
मलायका अरोरा आणि राहुल विजय यांच्या नावाची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा स्टायलिस्टने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला ज्यामध्ये अरहानची आई एपी ढिल्लॉनच्या कॉन्सर्टचा आनंद घेत होती. तसेच कॅप्शन लिहिले होते, 'थांबा, ही मलायकाची कॉन्सर्ट होती का?' एवढेच नाही तर त्यांचा सेल्फीही व्हायरल झाला. ज्यानंतर लोक तर्कवितर्क लावू लागले.
मलायका अरबाज आणि अर्जुन या दोघांसोबत झाली विभक्त
अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने अर्जुन कपूरला डेट करायला सुरुवात केली पण मलायकाचे हे नातेही फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. त्यानंतर वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे ती डगमगली नाही आणि कामावर जास्त लक्ष देऊ लागली. आज ती एकटी आहे आणि तिचा मुलगा आणि मित्रांसोबत वेळ घालवते.