Hotness Alert: मलायका अरोराच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 10:56 IST2019-08-06T10:55:31+5:302019-08-06T10:56:20+5:30
बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा हिचे बोल्ड फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. मलायकाचे ताजे फोटोही सध्या वेगाने व्हायरल होत आहेत.

Hotness Alert: मलायका अरोराच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, फोटो व्हायरल
बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा हिचे बोल्ड फोटो कायम सोशल मीडियावर व्हायरल होतात. मलायकाचे ताजे फोटोही सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. मलायकाने पुन्हा एकदा बिकिनी फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर खळबळ निर्माण केली आहे.
या फोटोंमध्ये मलायका एका सुंदर बीचवर बसलेली दिसतेय. मल्टी कलर तिचा बिकिनी अवतार चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.
अलिकडे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत आहेत. प्रसारमाध्यमांतून आलेल्या वृत्तावरुन अंदाज बांधायचा तर हे कपल लवकरच विवाहबंधनातही अडकू शकते. मात्र, या वृत्ताचे दोघेही नेहमीच खंडण करत आले आहेत. गेल्या काही काळात दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत.
दीर्घकाळापासून मलायका अर्जुन कपूरसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. गत ६ जुनला अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनला बर्थ डे विश करताना, मलायकाने त्याच्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिवाय आपले नाते जगजाहिर केले होते.
सुरुवातीला मलायका व अर्जुन दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.
नुकतीच दोघांनी आपल्या प्रेमाची आणि नात्याची कबुली दिलीय. अलीकडे अर्जुन कपूर मलायकाच्या आई-वडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेला होता.
त्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. मलायकाचे वडील अनिल अरोरा सुद्धा या फोटोंमध्ये दिसले होते. या भेटीनंतर मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.