अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 14:32 IST2024-10-26T14:31:00+5:302024-10-26T14:32:57+5:30
Seema Sajdeh : सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचे मलायका अरोरासोबत असलेल्या नात्यावर सोहेल खानची एक्स पत्नी सीमा सजदेहने मौन सोडले आहे.

अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर सलमान खानला भेटली मलायका अरोरा, सीमा सजदेह म्हणाली...
सीमा सजदेह (Seema Sajdeh) सलमान खान(Salman Khan)च्या कुटुंबाला जवळून ओळखते. ती भाईजानचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान(Sohail Khan)ची एक्स पत्नी आहे. सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांचे मलायका अरोरा(Malaika Arora)सोबत असलेल्या नात्यावर सीमाने आपले मौन सोडले आहे. ११ सप्टेंबर रोजी मलायका अरोराचे वडील अनिल मेहता यांच्या निधनानंतर सलीम खान आणि त्यांचे कुटुंब अभिनेत्रीच्या दुःखात सामील झाले होते. भाऊ अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सलमान मलायकाला भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मलायका अनेक प्रसंगी खान कुटुंबासोबत दिसली आहे, परंतु सलमान यापूर्वी कधीही तिच्यासोबत अशा प्रसंगी सामील झाला नव्हता. सलमान आणि मलायका यांनी खास करून 'दबंग'मधील 'मुन्नी बदनाम' या लोकप्रिय गाण्यावर एकत्र काम केले होते. सलमानच्या या उपक्रमाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. खान कुटुंबाच्या एकजुटीचे लोकांनी कौतुक केले. सीमा सजदेहने न्यूज१८ शी बातचीत करताना खान कुटुंबीयांच्या वागणुकीचे कौतुक केले.
सलमानचे कुटुंब अडचणीतही राहतात एकत्र
सीमा म्हणाली, ‘ते खडकासारखे आहेत. जेव्हा एखादे संकट उद्भवते किंवा आपल्याला कशाचीही गरज भासते तेव्हा ते सर्व मदतीसाठी तयार असतात. हेच त्यांना एक कुटुंब बनवते.' कामाबद्दल सांगायचं तर सीमा सध्या नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्हज'च्या यशाचा आनंद घेत आहे.
सीमा सजदेहही या शोबद्दल बोलली
'फॅब्युलस लाइव्ह्स व्हर्सेस बॉलीवूड वाइव्हज' हा शो बॉलीवूडच्या सर्वात ग्लॅमरस पत्नींच्या लाइफस्टाइलवर भाष्य करतो. भावना, महीप, सीमा आणि नीलम यांनी शोमधून पुनरागमन केले आहे, तर रिद्धिमा कपूर साहनी, कल्याणी चावला आणि शालिनी पासी सारखे नवीन चेहरे दिसले आहेत.