Malaika Arora Video : दुबईत मलायका अरोराला चाहत्यांनी घेरलं, महिलेने धक्का देताच अभिनेत्री भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:56 AM2023-04-27T08:56:36+5:302023-04-27T08:58:07+5:30

मलायकाचा दुबईचा तो व्हिडिओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतोय.

Malaika Arora mobbed by fans in an event in dubai says dont push | Malaika Arora Video : दुबईत मलायका अरोराला चाहत्यांनी घेरलं, महिलेने धक्का देताच अभिनेत्री भडकली

Malaika Arora Video : दुबईत मलायका अरोराला चाहत्यांनी घेरलं, महिलेने धक्का देताच अभिनेत्री भडकली

googlenewsNext

Malaika Arora mobbed : फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) नुकतीच दुबईच्या एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. याठिकाणी तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. तिला बघून दुबईचे चाहते तर क्रेझी झाले. यावेळी मलायकाच्या भोवताली फॅन्सने असा काही गराडा घातला की तिचे तिथून जाणं कठीण झालं. तिने एका महिला चाहतीला टोकले आणि कृपया धक्का देऊ नका असेही सांगितले. 

मलायकाचा दुबईचा तो व्हिडिओ सध्या सगळीकडेच व्हायरल होतोय. शिमरी ब्लॅक बॅकलेस गाऊनमध्ये ग्लॅमरस लुकमध्ये दिसली. आधी तिने माध्यमांशी संवाद साधला आणि नंतर तिने चाहत्यांमध्ये वेळ घालवला.तिने चाहत्यांसोबत फोटो क्लिक केले. त्याचवेळी चाहत्यांनी मलायका अरोराला घेरलं. सर्वच तिच्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी आतुर होते. तेवढ्यात तिला काही महिला चाहत्यांचा धक्का लागला. कृपया धक्का देऊ नका असं ती म्हणताना दिसत आहे. 

मलायका नुकतीच बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसह सुट्टी एंजॉय करुन परतली आहे. दोघेही जर्मनी येथे हॉलिडे साठी गेले होते. तेथील अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. सध्या दोघांच्या लग्नाचीच चर्चा आहे. मात्र त्यांचा इतक्यात लग्नाचा प्लॅन नाही असंच दिसतंय. अनेकदा दोघंही वयातील अंतरामुळे ट्रोलही होतात.

Web Title: Malaika Arora mobbed by fans in an event in dubai says dont push

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.