'माझी चूक नव्हती..', वयाच्या २५ व्या वर्षी Arbaaz khanसोबतच्या लग्नावर Malaika Aroraनं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 05:30 PM2022-01-22T17:30:34+5:302022-01-22T17:31:24+5:30
मलायका अरोरा (Malaika Arora)ने वयाच्या 25 व्या वर्षी अरबाज खान(Arbaaz khan)शी लग्न केले. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले आणि 19 वर्षांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला
मलायका अरोरा (Malaika Arora)ने वयाच्या 25 व्या वर्षी अरबाज खान(Arbaaz khan)शी लग्न केले. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले आणि 19 वर्षांनी 2017 मध्ये घटस्फोट घेतला. मलायका आणि अरबाजला 19 वर्षांचा मुलगा अरहान खान देखील आहे. मलायका सध्या अर्जुन कपूर(Arjun Kapoor)सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. 48 वर्षीय मलायका आजही तिच्या वयाच्या महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. पण अरबाज खानसोबत लहान वयात लग्न ही 'चूक' होती का? मलायकाने पहिल्यांदाच यावर मौन सोडले आहे.
मलायका अरोरा ((Malaika Arora)म्हणतात की 29 व्या वर्षी आई होणे किंवा वयाच्या 25 व्या वर्षी लग्न करणे ही तिची चूक नव्हती. तसेच यामुळे तिच्या प्रोफेशनल लाईमध्ये कोणतीही अडचण आली नाही. ती म्हणते, “मला असे वाटते की मी इतर महिलांसाठी एक उदाहरण बनले आहे. मी सर्व काही ग्लॅमरस पद्धतीने केले.
मलायका अरोराचा ग्लॅमरस लूक असो किंवा तिची स्टाईल, फिटनेस किंवा फोटोशूट, या वयातही ती सगळीकडे आपली छाप सोडते.' मलायका म्हणाली की लग्न करणे किंवा मुलं होणं हा तिचा स्वतःचा निर्णय होता आणि त्याबद्दल तिला कोणताही पश्चाताप नाही. ती म्हणते, 'हे सगळं करून मी काही चुकीचं केलं नाही. मी कालांतराने स्वतःला आव्हान दिले आणि पुढे गेलो.
मलायका अरोरा सध्या मुलगा अरहानसोबत जास्त वेळ घालवत आहे. अरहान नुकताच सुट्टीवर घरी परतला आहे. तो परदेशात शिकतो आहे. गेल्या महिन्यात 10 डिसेंबरला अरहान मुंबईला परतला होता. मलायकासोबत अरबाज खानही मुलाला रिसीव करण्यासाठी एअरपोर्टवर गेला होता.