अरबाज खानसह घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोराला सतावतेय मुलाची चिंता, म्हणाली......!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2020 12:00 PM2020-02-06T12:00:48+5:302020-02-06T12:06:01+5:30
जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती.
छैया छैया गर्ल मलायका सध्या अर्जुन कपूरसह असलेल्या अफेअरविषयी खुल्लम खुल्ला बोलताना दिसते. गेल्या काही दिवसांआधीच तिने अर्जुनसोबतच्या रिलेशनबाबत विविध खुलासे केले होते. आहेत. दोघंही एप्रिल महिन्यात रेशीमगाठीत अडकणार अशी चर्चा होती. मात्र या चर्चा केवळ माध्यमांमध्येच सुरू असल्याचे तिने स्पष्ट केले. मात्र यावरून दोघंही इतक्यात लग्न करणार नसल्याचे स्पष्ट झाले. यासोबतच अरबाजसोबतचं नातं संपवायचं नव्हतं असंही तिने सांगितले. “प्रत्येकाला जीवनात जोडीदार, नातं हवं असतं. त्यावेळी अरबाजसह काडीमोड घेऊ नये” असं अनेकांनी सुचवलं होतं असंही मलायकाने सांगितलं. मात्र काडीमोड घेण्याचा आपला निर्णय झाला होता आणि या निर्णयामुळे खूश आहे.
सारं विसरून जीवनात पुढे जाताना ज्याच्यासोबत तुमचं चांगलं नातं निर्माण व्हावं असा एक चांगला मित्र आणि जोडीदार असावा, तसं झाल्यास तुम्ही नशीबवान असता. जीवनात आनंदी राहण्याची दुसरी संधी मिळाली असं समजावं असं सांगत मलायकाने अर्जुनसोबतच्या चांगल्या संबंधांची अप्रत्यक्ष कबुलीच दिली होती.
अरबाजसह नाते संपवले असले तरी मुलासह मात्र तिचे नाते आजही तसेच आहे. अरहानला अर्जुनसोबतच्या नात्याविषयी माहित असून तोही यासाठी खुश आहे. माझा मुलगा अरहान नेहमीच माझी पहिली गरज आहे. तो मला खूप समजून घेतो आणि पाठिंबा देतो. मला याची खूप गरज होती. त्याच्यासाठी माझा आनंद आणि माझ्यासाठी त्याचा आनंद नेहमीच सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. मला घडवण्यात अरहानची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे तिने सांगितले.