'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता...', Malaika साठी Arbaaz पासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 04:27 PM2022-01-24T16:27:56+5:302022-01-24T16:37:45+5:30

मलायका (Malaika Arora)साठी घटस्फोटानंतरचे आयुष्य सोपे नव्हते, एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले.

malaika arora opens up about divorce with arbaaz khaan says that separation was lowest phase of her life | 'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता...', Malaika साठी Arbaaz पासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नव्हता

'आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता...', Malaika साठी Arbaaz पासून वेगळे होण्याचा निर्णय सोपा नव्हता

googlenewsNext

मलायका अरोरा (Malaika Arora)ने अवघ्या २५ व्या वर्षी अरबाज खान (Arbaaz Khan) सोबत लग्न झाले होते. पण 19 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला आणि आपापल्या आयुष्यात पुढे गेले. सध्या ती बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर(Arjun Kapoor) ला डेट करत आहे. मलायकासाठी घटस्फोटानंतरचे आयुष्य सोपे नव्हते. एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितले अरबाज खानपासून वेगळे होणे तिच्यासाठी सोपे नव्हते. हा निर्णय तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.


बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितले की, अरबाजपासून वेगळे झाल्यानंतर तिच्यावर कौटुंबिक दबाव होता. त्याच बरोबर याचा मुलावर कसा परिणाम होईल, आपण याला कसे सामोऱ्य जाऊ आणि समाजाचा दृष्टीकोन काय असेल याचीही तिला चिंता होती. 

वेगळं होणं सोप्प नव्हते
अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या मनात या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता असे मला वाटले. या एका निर्णयामुळे माझ्या संपूर्ण आयुष्यात गोंधळ उडाला. मला या बदलाला सामोरे जावे लागले कारण त्यात माझं मुलं आणि माझे कुटुंब सामील होते.मलायकाने सांगितले की, जेव्हा तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्या मनात अनेक गोष्टी सुरू होत्या. ती म्हणते, 'माझ्या या निर्णयाचा माझ्याशी संबंधित लोकांवर परिणाम होणार होता. शेवटच्या क्षणी आम्ही दोघेच होतो. आम्ही पती-पत्नी होतो आणि एकत्र होतो. आम्ही ठरवले की हे सर्वोत्तम आहे. पण ते सर्वात कठीण होते. तो माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.


मलायका अरोरा सध्या मुलगा अरहानसोबत जास्त वेळ घालवत आहे. अरहान नुकताच सुट्टीवर घरी परतला आहे. तो परदेशात शिकतो आहे. गेल्या महिन्यात 10 डिसेंबरला अरहान मुंबईला परतला होता. मलायकासोबत अरबाज खानही मुलाला रिसीव करण्यासाठी एअरपोर्टवर गेला होता. 

Web Title: malaika arora opens up about divorce with arbaaz khaan says that separation was lowest phase of her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.