Malaika Arora : अरबाजच्या गर्लफ्रेंडवर पहिल्यांदाच बोलली मलायका; मला त्यांच्या नात्याबद्दल खात्री...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 09:57 AM2022-12-13T09:57:25+5:302022-12-13T09:59:21+5:30
अरबाज आणि जॉर्जियाचे नाते कसे आहे, त्यांचा ब्रेकअप झाला आहे का या प्रश्नावर मलायकाने पहिल्यांदाच खुलासा केला आहे.
Malaika Arora : मलायका अरोरा आणि अरबाज खान (Arbaaz Khan) यांच्या घटस्फोटानंतर त्यांचे वैयक्तिक आयुष्य नेहमी चर्चेत असते. एकीकडे अरबाज आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया (georgia)यांच्या नात्याची चर्चा आणि दुसरीकडे अर्जुन कपुर आणि मलायकाची चर्चा जोर धरुन असते. पण अरबाज आणि जॉर्जियाचे नाते कसे आहे, त्यांचा ब्रेकअप झाला आहे का या प्रश्नावर मलायकाने पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये मलायकाने करण जोहरसोबत चॅट करताना अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. (Moving In With Malaika Show)
अरबाजसोबतच्या नात्यावर काय म्हणाली मलायका ?
'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमध्ये यावेळी दिग्दर्शक करण जोहरची (Karan Johar) एंट्री झाली. करण जोहर बॉलिवुडमध्ये गॉसिपसाठीही लोकप्रिय आहे. तसेच तो मलायकाचा चांगला मित्रही आहे. करणने मलायकाला अरबाजसोबत आता तिचे नाते कसे आहे अशा प्रश्न केला. यावर मलायका म्हणाली, 'आमच्यात अजुनही चांगले नाते आहे. पुर्वीपेक्षा आमचे सध्याचे नाते खुप चांगले आहे.'
अरबाज खान आणि जॉर्जियाच्या नात्यावर काय म्हणाली मलायका ?
करणने मलायकाला विचारले, 'अरबाज आणि जॉर्जियाच्या ब्रेकअपची सध्या चर्चा सुरु आहे. तु त्याच्याशी याविषयी बोलली का?' यावर मलायका म्हणाली, 'याबद्दल मला खात्रीशीर माहिती नाही. मी या विषयावर अरबाज किंवा मुलगा अरहान दोघांशीही चर्चा करत नाही.'
मलायका पुढे म्हणाली, 'प्रामाणिकपणे सांगायचं तर मी हे सर्व प्रश्न विचारत नाही. मी माझ्या मुलाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करत नाही. माझा तो स्वभावच नाही. असे केले तर ते मर्यादेबाहेर वागल्यासारखे वाटते. मला माहिती आहे अनेक कपल घटस्फोटानंतर आपल्या मुलांच्या माध्यमातुन एकमेकांविषयी माहिती ठेवतात. पण मी तशी नाहीए. मी या सर्व गोष्टींपासून दूर राहते.'
मलायका अरोरा यापुर्वी कधीही आपल्या वैयक्तिक आयुष्यावर खुलेपणाने बोलली नव्हती. पण आता तिच्या या नवीन शो मधून ती अनेक गुपिते उघड करताना दिसत आहे. या शोला प्रेक्षकही प्रतिसाद देताना दिसत आहेत.