Stunning! मलायका अरोराचे नव्या वर्षातील पहिले फोटोशूट, पुन्हा एकदा दिसला हॉट अवतार!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 08:00 AM2020-01-04T08:00:00+5:302020-01-04T08:00:02+5:30
HOT फोटोशूट!!
मलायका अरोराने नव्या वर्षाची रोमॅन्टिक सुरुवात केली. नव्या वर्षाचे स्वागत करताना अर्जुन कपूरला किस करतानाचा फोटो शेअर करत तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. ‘सूरज, सितारे, रोशनी, खुशियां ...2020’,या कॅप्शनसह मलायकाने शेअर केलेल्या या रोमॅन्टिक फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आता मलायकाच्या फोटोशूटचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. नव्या वर्षाच्या मुहूर्ताला मलायकाने एक हॉट फोटोशूट केले. या वर्षातील पहिल्या फोटोशूटचे फोटो मलायकाने सोशल मीडियावर शेअर केलेत आणि काहीच तासात चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा वर्षाव केला. ते क्षणात व्हायरल झालेत.
मलायका बॉलिवूडमध्ये फारशी अॅक्टिव्ह नसली तरी चर्चेत कसे राहायचे हे तिला चांगलेच कळते. सोशल मीडियावर स्वत:चे हॉट फोटो शेअर करत ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
लवकरच मलायका एक डान्स शो जज करताना दिसणार आहे. होय, ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या शोमध्ये ती परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.
मलायकाने याआधी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअॅलिटी शोची जज होती. नज बलिये, जरा नचके दिया, झलक दिखला जा यासारखे अनेक रिअॅॅलिटी शो जज करताना ती दिसली आहे.
तूर्तास मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे.
लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. ताज्या मुलाखतीत मलायकाने अर्जुनसोबतचे तिचे ड्रिम वेडिंग कसे असेल ते सांगितले होते. माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. माझी गर्लगँग माझी ब्राईड्समेट असेल. ब्राईड्समेटची प्रथा मला मनापासून आवडते, असे ती म्हणाली होती.