...अन् मलायकाने उचलला रस्त्यात पडलेला कचरा, व्हिडिओ पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 02:35 PM2024-05-28T14:35:15+5:302024-05-28T14:35:41+5:30

मलायकाच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहून मलायकाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. 

malaika arora picking garbage of road netizens praised her after watching video | ...अन् मलायकाने उचलला रस्त्यात पडलेला कचरा, व्हिडिओ पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

...अन् मलायकाने उचलला रस्त्यात पडलेला कचरा, व्हिडिओ पाहून नेटकरी करत आहेत कौतुक

मलायका अरोरा ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कधी फॅशनमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे मलायका चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आतादेखील मलायकाच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ पाहून मलायकाचं नेटकऱ्यांकडून कौतुक होत आहे. 

जीमला जाताना किंवा पार्टी आणि डिनरला जाताना अनेकदा मलायकाला स्पॉट करण्यात येतं. पापाराझींच्या कॅमेऱ्यात मलायका अनेकदा कैद होताना दिसते. नुकतंच मलायकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मलायकाने केलेली कृती पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. विरल भय्यानी या पापाराझी पेजवरुन मलायकाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत मलायका बिल्डिंगच्या गेटबाहेर पडलेला कचरा उचलताना दिसत आहे. 

मलायकाचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. "याप्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे", "मलायकाने मनं जिंकली" अशा कमेंट्स काहींनी या व्हिडिओवर केल्या आहेत. तर काहींनी मलायकाला ट्रोलही केलं आहे. "कॅमेऱ्यासमोर कोणीही चांगलं वागतं", "कॅमेरा चालू आहे हे तिला माहितीये" असं म्हणत काहींनी तिला ट्रोल केलं आहे. 

दरम्यान, मलायका तिच्या बॉलिवूडमधील करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केलं होतं. पण, २०१७मध्ये काही कारणांमुळे ते विभक्त झाले. सध्या मलायका अर्जुन कपूरबरोबर लिव्ह इनमध्ये राहत आहे. अनेकदा त्यांच्या दोघांच्या लग्नाबाबतही चर्चा रंगल्या होत्या. 

Web Title: malaika arora picking garbage of road netizens praised her after watching video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.