अर्जुन कपूरसोबत लग्नाच्या चर्चांवर मलायका म्हणाली असे काही, वाचून तुम्हीसुद्धा व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 02:30 PM2019-03-12T14:30:17+5:302019-03-12T14:52:22+5:30
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या आपला लव्ह लाईफ घेऊन चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या या लव्ह बर्डसच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे
ठळक मुद्देअंबानी फॅमिलीच्या लग्नात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलेएप्रिलमध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या आपला लव्ह लाईफ घेऊन चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सध्या या लव्ह बर्डसच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. अंबानी फॅमिलीच्या लग्नात दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आले. दोघांनी अकाश-श्लोकाचे लग्न एकत्र अटेंड केले. एप्रिलमध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मीडिया रिपोर्टनुसार दोघे आधी ख्रिश्चनपद्धतीने लग्न करण्याचा विचार केला आहे. याच दरम्यान मलायकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मलायका म्हणाली, चर्चमध्ये जाऊन लग्न करण्याची बातमी मीडियामध्येच तयार करण्यात आली आहे.
एका इव्हेंटमध्ये मलायकाला अर्जुन कपूरसोबतच्या नात्यावर प्रश्न विचारण्यात आला, यावर तिने सांगितले, मला वाटत सगळ्यांनी आयुष्यात मागच्या गोष्टी मागे टाकावं आणि प्रत्येकाला एक प्रेम करणार व्यक्ति हवा असते. सगळे अशा एका प्रेमाच्या शोधात असतात. जर अशी व्यक्ति तुम्हाला मिळाला तर तुम्ही नशीबवान आहात. आयुष्य तुम्हाला दुसरी संधी देतेय.
गेल्या अनेक दिवसांपासून दोघांनी खंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक अलिशान फ्लॅट खरेदी केल्याची चर्चा आहे आणि सध्या इंटीरियचे काम सुरु आहे. लग्नानंतर मलायका व अर्जुन या फ्लॅटमध्ये शिफ्ट होतील, असे मानले जात आहेत.काही दिवसांपूर्वीच करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये मलायकाने प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. तर या आधी अर्जुन कपूरनेदेखील याच चॅट शोमध्ये अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत.