Malaika Arora : “मी जास्त दिसू लागले तर...”; मलायकाला सतावू लागलीये ही भीती....!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 15:39 IST2023-04-05T15:38:27+5:302023-04-05T15:39:02+5:30
Malaika Arora : 'तेरा की ख्याल' या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये मलायका करिअरबद्दल बोलली. ॲक्टिंग करिअरबद्दलची एक भीतीही तिने बोलून दाखवली.

Malaika Arora : “मी जास्त दिसू लागले तर...”; मलायकाला सतावू लागलीये ही भीती....!!
मलायका अरोरा (Malaika Arora) बॉलिवूडच्या सिनेमांत दिसत नसली तरी तिची चर्चा जोरात असते. कधी बोल्ड फोटोंमुळे, कधी फॅशनमुळे, कधी ट्रेंडी डान्समुळे तर कधी रिलेशनशिपमुळे ती चर्चेत राहते. तूर्तास मात्र तिच्या नव्या गाण्याची चर्चा आहे. होय, पंजाबी गायक गुरु रंधावा व मलायकाचं एक गाणं रिलीज झालं आहे. 'तेरा की ख्याल' असे बोल असलेल्या या गाण्यातील मलायकाचा डान्स आणि किलर लुक पाहण्यासारखा आहे. गुरू रंधावासोबतची तिची केमिस्ट्रीही जबरदस्त आहे. या गाण्याच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये मलायका करिअरबद्दल बोलली. ॲक्टिंग करिअरबद्दलची एक भीतीही तिने बोलून दाखवली.
“मला अभिनयाच्या खूप ऑफर्स आल्या, पण इतक्या वर्षांत मी या ऑफर्सकडे कधीच लक्ष दिलं नाही. कारण मला कायम डान्स आणि टीव्हीमध्ये रस होता. पण आता मी अभिनयावरही लक्ष केंद्रित करणार आहे. कुणास ठाऊक, कदाचित लवकरच तुम्ही मला अभिनय करताना बघू शकाल,” असं मलायका म्हणाली.
मलायका दीर्घकाळानंतर एका म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली. याबद्दल बोलताना ती म्हणाली, “ जर मी जास्त दिसू लागले तर कदाचित माझी डिमांड कमी होईल. कदाचित लोक मला मिस करणार नाहीत. अनेक वर्षांपासून मी होकार द्यावा असं कुठलंही गाणं मला ऑफर झालं नव्हतं. मात्र, गुरुचं गाणं ऐकल्यावर मी लगेच होकार दिला. गुरुने जेव्हा हे गाणं मला ऐकवलं तेव्हा मी अमेरिकेत होते.”