Video: मलायकाच्या सावत्र वडिलांवर आज अंत्यसंस्कार, आईची रडून रडून वाईट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:08 AM2024-09-12T11:08:31+5:302024-09-12T11:10:58+5:30

मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता हे ६२ वर्षांचे होते.

Malaika Arora s father funeral video seen actress with her mother and son | Video: मलायकाच्या सावत्र वडिलांवर आज अंत्यसंस्कार, आईची रडून रडून वाईट अवस्था

Video: मलायकाच्या सावत्र वडिलांवर आज अंत्यसंस्कार, आईची रडून रडून वाईट अवस्था

अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora) सावत्र वडिलांनी काल आत्महत्या केली. ही आत्महत्या आहे की अपघात याचा पोलिस तपास करत आहेत. आज अनिल मेहता (Anil Mehta) यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. यासाठी मलायका, तिची बहीण अमृता आणि त्यांची आई जॉयस या दाखल झाल्या. मलायताची आईला अश्रू अनावर होत होते. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता हे ६२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काही वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. बांद्रा येथील आएशा अपार्टमेंटमध्ये ते पत्नी जॉयससोबत राहत होते. याच इमारतीवरुन उडी मारत त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मलायका, मुलगा अरहान, आई जॉयस आणि बहीण अमृतासह निघाली. त्यांचा घराबाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात त्यांची आई जॉयस यांना अश्रू अनावर झाले आहेत. पतीच्या निधनाने त्यांना धक्का बसला आहे.  नातू अरहान आजीला घेऊन जाताना दिसत आहे. 


काल अनिल मेहता यांनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली. त्यावेळी जॉयस या घरातच होत्या. तर मलायका पुण्यात होती. ती तातडीने मुंबईला रवाना झाली. तर तिचा पूर्व पती अरबाज खान हा पहिल्यांदा तिच्या घरी पोहोचला. यानंतर अख्खं खान कुटुंब दाखल झालं होतं. यानंतर अर्जुन कपूर आणि इतर मित्रपरिवार आले. मलायका आणि तिच्या कुटुंबाला सर्वांनीच धीर दिला. मलायकाचते सावत्र वडील होते मात्र सख्ख्या बापलेकीप्रमाणेच त्यांचं नातं होतं. आत्महत्येआधी अनिल मेहता यांनी दोन्ही मुलींना फोन केला होता अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: Malaika Arora s father funeral video seen actress with her mother and son

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.