अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:27 AM2024-11-01T11:27:46+5:302024-11-01T11:28:50+5:30
अर्जुनने ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म करताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मलायका आणि अर्जुनचं ब्रेकअप झालं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर अर्जुनने दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चाहतीच्या प्रश्नाला उत्तर देताना सिंगल असल्याचं सांगत मलायकाबरोबर ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब केलं. अर्जुनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अर्जुनने ब्रेकअप झाल्याचं कन्फर्म करताच मलायकाने तिच्या इन्स्टाग्रामवर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
अर्जुनने ब्रेकअप झाल्याचं सांगताच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने "एका क्षणासाठी हृदयाला भिडणारं आयुष्यभरासाठी हृदयाला स्पर्श करून जातं", असं म्हटलं आहे. मलायकाची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. अर्जूनच्या ब्रेकअपनंतरच्या व्हिडिओनंतर आता मलायकाच्या या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अर्जुन-मलायका ब्रेकअप
अर्जुन कपूर आणि मलायका हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. सोशल मीडियावर फोटो शेअर करत ते एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसायचे. मलायका आणि अर्जुन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल होते. पण, काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी ब्रेकअप झाल्याचं जाहीर केलं होतं.
मलायका-अरबाज घटस्फोट
मलायकाने १९९८ साली अरबाज खानशी लग्न केलं होतं. जवळपास १९ वर्षांच्या सुखी संसारानंतर मलायका आणि अरबाज घटस्फोट घेत एकमेकांपासून वेगळे झाले. त्यांना अरहान हा मुलगा आहे. अरबाजशी घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुनबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तर अरबाजने गेल्याच वर्षी शूरा खानशी निकाह करत पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात केली.