No Filter! मलायकाने शेअर केला चेअरवर बसलेला इतका बोल्ड फोटो, बघतच राहिले फॅन्स....
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:17 PM2022-02-12T13:17:42+5:302022-02-12T13:20:08+5:30
Malaika Arora Hot Photo : मलायकाने असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिने काही नो फिल्टर फोटो शेअर केले आहेत जे बघून तिचे फॅन्स फिदा झाले आहेत.
मलायका अरोरा (Malaika Arora) आपल्या बोल्ड फोटोजनी नेहमीच तिच्या फॅन्सची झोप उडवत असते. इन्स्टाग्रामवर ती तिचे एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत असते. मलायकाने असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिने काही नो फिल्टर फोटो शेअर केले आहेत जे बघून तिचे फॅन्स फिदा झाले आहेत.
फोटोत तुम्ही बघू शकता की, मलायकाने फ्लोरल प्रिंटेड प्लेसूट घातला आहे आणि ती एका चेअरवर बसली आहे. या फोटोत मलायकाने टोन्ड लेग्स फ्लॉन्ट केले आहेत. तिचा हा बोल्ड अवतार पाहून तिच्या फॅन्सची बोलती बंद झाली आहे. पाहता पाहता तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
मलायकाने हे फोटो शेअर करत कॅप्शनला लिहिलं की, 'नो फिल्टर'. या फोटोंवर तिचे फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत आणि भरभरून तिची तारीफ करत आहेत. एकाने कमेंट केली की, तुला फिल्टरची गरजही नाही. अशाप्रकारच्या कमेंट करून फॅन्स तिच्या सुंदरतेचं कौतुक करत आहेत.
मलायका तिच्या पर्सनल लाइफमुळेही नेहमीच चर्चेत असते. अरबजा खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर काही वर्षांपासून ती अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही नेहमीच पार्टी, इव्हेंट्समध्ये सोबत दिसतात. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत अरबाज खानला मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तो म्हणाला होता की, 'भावा फारच इंटेलिजन्ट प्रश्न विचारला तुम्ही. फार मेहनत केली असेल. रात्रभर यावर अभ्यास केला असेल तुम्ही. या प्रश्न उत्तर मला द्यायचं आहे. पण मला थोडा वेळ द्या. उद्या उत्तर दिलं तर चालेल का?'.
एप्रिलमध्ये लग्न करणार मलायका?
मलायका आणि अर्जुन कपूरच्या लग्नाची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. अशीही चर्चा होती की, दोघे एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत. पण अर्जुनच्या बोलण्यावरून हे स्पष्ट दिसतं की, सध्या त्याचा लग्नाचा काही विचार नाही. त्यामुळे एप्रिलमध्ये त्यांच्या लग्नाची केवळ अफवा पसरली आहे.