मलायकाचं बहिणीसोबत भांडण, मध्यस्थीसाठी आलेल्या नेहा धुपियालाही सुनावलं; म्हणाली...तू तर लांबच राहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 01:20 PM2022-12-28T13:20:39+5:302022-12-28T13:21:50+5:30

बॉलीवूडची हॉट अँड ग्लॅमरस डान्सिंग स्टार मलायका अरोरा हिला तुम्ही कधी संतापलेलं पाहिलंय का?

malaika arora shouts at neha dhupia fight with sister amrita arora moving in with malaika arora | मलायकाचं बहिणीसोबत भांडण, मध्यस्थीसाठी आलेल्या नेहा धुपियालाही सुनावलं; म्हणाली...तू तर लांबच राहा!

मलायकाचं बहिणीसोबत भांडण, मध्यस्थीसाठी आलेल्या नेहा धुपियालाही सुनावलं; म्हणाली...तू तर लांबच राहा!

बॉलीवूडची हॉट अँड ग्लॅमरस डान्सिंग स्टार मलायका अरोरा हिला तुम्ही कधी संतापलेलं पाहिलंय का? नसेल तर नुकतंच तिच्या रियालिटी शो 'मूविंग इन विथ मलायका' हिचा लेटेस्ट एपिसोड नक्की पाहा. ज्या एपिसोडची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियात होत आहे. कारण या एपिसोडमध्ये मलायका चांगलीच संतापलेली पाहायला मिळाली. तेही तिची मैत्रीण आणि अभिनेत्री नेहा धुपिया हिच्यावर मलायका संतापली. 

मलायका आणि बहिण अमृतामध्ये अबोला
शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पाहायला मिळालं की, मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता यांच्यातील अबोला दूर करण्यासाठी नेहा धुपिया पुढाकार घेतला. तिनं अमृताचा मेसेज मलायकापर्यंत पोहोचवला. आपल्या बहिणीनं आपली थट्टा केली याचं अमृताला वाईट वाटलं म्हणून ती नाराज असल्याचं नेहानं मलायकाला सांगितलं. यावरच मलायका संतापली. "अमृता तिचं मन मोकळं करण्यासाठी माझ्याशी नव्हे, तर तुझ्याशी (नेहा धुपिया) संपर्क साधला. याचं मला वाईट वाटलं", असं मलायका म्हणाली. मलायकाच्या मतानुसार अमृतानं थट्टा इतक्या गंभीरतेनं घेण्याची गरज नव्हती. इतकं सगळं झाल्यानंतर मलायका अमृताच्या घरी जाते आणि दोन्ही बहिणी दोघांमधील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. यासाठी दोघी लंच डेटवर जातात. 

नेहा धुपियावर संतापली मलायका
"तू जे थट्टा केलीस ती अर्धवट होती. अमृतावर जे जोक्स क्रॅक केले गेले त्यातून ती नेहमीच बकरा बनते असा तिचा समज झाला आहे", असं नेहा धुपिया मलायका हिला म्हणाली. तर मलायका हिनं अमृतानं इतकी छोटी गोष्ट मनाला लावून घेण्याची गरज नव्हती. आपण काही जाणूनबुजून केलेलं नाही असं स्पष्टीकरण दिलं. यात नेहानं मलायका हिला अमृताच्या बाजूनं समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मलायका तिच्या मतावर ठाम होती. नेहा मात्र वारंवार अमृताची बाजू घेत असल्यानं एकवेळ अशी आली की मलायका वैतागली आणि तिनं नेहा धुपियालाही सुनावलं. एक चांगली मैत्रिण असल्याच्या नात्यानं मी तुला सांगते तू यापासून दूर राहा, असं मलायकानं नेहा हिला सुनावलं. 

लंच डेटमध्ये अमृतानं केलं मन मोकळं
दोघी बहिणी एकमेकांबद्दलचं गैरसमज आणि नाराजी दूर करण्यासाठी लंच डेटवर गेल्या. यात अमृतानं आपल्या मनातलं सारं मलायकाला बोलून दाखवलं. "तू काहीही बोलशील आणि मी ते प्रत्येकवेळी सहन करेन असं तू गृहित धरू नकोस", असं अमृतानं मलायला हिला म्हटलं. तसंच आपली खाण्याची पद्धत आणि वजन यावरुन केलेली थट्टा कशी चुकीची होती हे अमृता मलायका हिला समजावताना दिसली. त्यावर मलायकानं अमृताला दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण दिलं. दोन्ही बहिणींमधील भांडण सध्या चर्चेचा विषय बनला आहे. काहींना दोन्ही बहिणींमधील हा रियल बॉन्ड आवडत आहे. आता येणाऱ्या एपिसोडमध्ये दोन्ही बहिणींमधील ट्युनिंगचा कोणता नवा भाग पाहायला मिळतो हे बघावं लागेल. 

Web Title: malaika arora shouts at neha dhupia fight with sister amrita arora moving in with malaika arora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.