Hotness Alert: बॉलिवूडच्या ‘मुन्नी’ची बातच न्यारी! शिमर ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस अवतार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 16:00 IST2019-10-20T16:00:00+5:302019-10-20T16:00:06+5:30
वयाची 40 ओलांडली असली तरी मलायकाचे सौंदर्य काही कमी होत नाही. दिवसें दिवस मलायका आपल्या सौंदयार्ने सा-यांचे लक्ष वेधून घेते

Hotness Alert: बॉलिवूडच्या ‘मुन्नी’ची बातच न्यारी! शिमर ड्रेसमध्ये दिसला ग्लॅमरस अवतार!!
बॉलिवूडच्या ‘मुन्नी’ची बातच न्यारी, जेव्हा जेव्हा ती मीडियाच्या कॅम-यांसमोर येते तेव्हा कॅमे-यात कैद होणा-या तिच्या प्रत्येक अदा या घायाळ करणा-या असतात. वयाची 40 ओलांडली असली तरी मलायकाचे सौंदर्य काही कमी होत नाही. दिवसें दिवस मलायका आपल्या सौंदयार्ने सा-यांचे लक्ष वेधून घेते. आजच्या अभिनेत्रींनाही लाजवेल असे मलायकाचे सौंदर्य आजही सा-यांसाठी कौतुकाचा विषय ठरतो. मलायकाचे ताजे फोटोशूट पाहिल्यानंतर तुम्हालाही हे पटेल. मलायकाच्या अदा पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.
मलायकाने नुकतेच एक फोटोशूट केले. या फोटोशूटमध्ये ती आकाशी रंगाच्या शिमर ड्रेसमध्ये दिसतेय. प्रत्येक पोजमध्ये तिच्या अदा खल्लास करतात.
मलायकाचा हा हॉट अंदाज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सध्या मलायका अर्जुन कपूरसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेक ठिकाणी एकत्र पाहायला मिळतात. कधी डिनर डेटवर तर कधी एकत्र इव्हेंटमध्ये ते एकत्र दिसतात. हे कपल लवकरच विवाहबंधनातही अडकणार असेही मानले जात आहे.
नुकताच अर्जुन कपूर मलायकाच्या आई-वडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. मलायकाचे वडील अनिल अरोरा सुद्धा या फोटोंमध्ये दिसले होते. या भेटीनंतर मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. पण तूर्तास तरी मलायका व अर्जुनने लग्नाचे संकेत दिलेले नाहीत.
गत ६ जुनला अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनला बर्थ डे विश करताना, मलायकाने त्याच्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिवाय आपले नाते जगजाहिर केले होते. सुरुवातीला मलायका व अर्जुन दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.