Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 09:03 AM2024-09-12T09:03:47+5:302024-09-12T09:04:33+5:30

Malaika Arora Father Death: काल रात्री उशिरा मलायकाने सोशल मीडिया पोस्ट करत अधिकृत स्टेटमेंट दिलं आहे.

Malaika Arora social media post after step father Anil Mehta s demise | Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...'

Malaika Arora Father Death: सावत्र वडिलांच्या निधनानंतर मलायका अरोराची सोशल मीडियावर पोस्ट; म्हणाली, 'ते खूप...'

Malaika Arora Father Death:  अभिनेत्री मलायका अरोराच्या (Malaika Arora)  वडिलांनी काल बांद्रा येथील राहत्या घरी इमारतीवरुन उडी मारत आत्महत्या केली. ते तिचे सावत्र वडील होते. मलायका तेव्हा पुण्यात होती. बातमी कळताच ती तातडीने मुंबईत आली. मलायकाचा पूर्व पती अरबाज, तसंच तिचे इतर मित्र तिच्या घरी पोहोचले. काल रात्री उशिरा मलायकाने सोशल मीडिया पोस्ट करत अधिकृत स्टेटमेंट दिलं आहे. काय आहे मलायकाची पोस्ट?

मलायका अरोराच्या सावत्र वडिलांचं नाव अनिल कुलदीप मेहता होतं. ते ६२ वर्षांचे होते. स्टेटमेंटमध्ये मलाकाने लिहिले, "आमचे वडील अनिल मेहता यांच्या निधनाची बातमी सांगताना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. ते खूप प्रेमळ होते. चांगले आजोबा, पती आणि बेस्ट फ्रेंड होते. त्यांच्या निधनाने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. माध्यम आणि सर्व हितचिंतकांनी आम्हाला या काळात प्रायव्हसी द्यावी ही विनंती. तुमची काळजी, पाठिंबा आणि आदराची आम्हाला जाणीव आहे." शेवटी जॉयस, मलायका, अमृता, शकील, अरहान, अझान, रायन ही नावं लिहिली आहेत.


मलायकाच्या पोस्टवर अेक कलाकारांनी कमेंट करत तिला धीर दिला आहे. तसंच तिच्या वडिलांनी आत्महत्या केली की आता अपघात होता याचा तपास पोलिस करत आहेत. ज्या वेळी ही घटना घडली तेव्हा मलायकाची आई जॉयस या घरातच होत्या. त्यांनी पोलिसांना स्टेटमेंटही दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा अपघात आहे. 

मलायका ११ वर्षांची असतानाच जॉयस आणि त्यांच्या पतीचा घटस्फोट झाला होता. अनिल मेहता हे मलायकाचे सावत्र वडील होते. मलायकाचा सावत्र वडिलांशीही चांगला बाँड होता. 
 

Web Title: Malaika Arora social media post after step father Anil Mehta s demise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.