Malaika Arora video: मलायकाच्या व्हिडीओतील आजोबांची रंगली चर्चा, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून लोटपोट होऊन हसाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 11:52 IST2022-07-11T11:51:45+5:302022-07-11T11:52:36+5:30
Malaika Arora video: मलायकाचा जिम लुक नेहमी चर्चेत असतो. पण सध्या ना मलायकाची चर्चा आहे ना, तिच्या जिम लुकची. चर्चा आहे ती व्हिडीओतील आजोबांची.

Malaika Arora video: मलायकाच्या व्हिडीओतील आजोबांची रंगली चर्चा, नेटकऱ्यांच्या कमेंट्स वाचून लोटपोट होऊन हसाल...
Malaika Arora video: मलायका अरोरा (Malaika Arora) किती फिटनेस फ्रिक आहे, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. एकही दिवस ती वर्कआऊट चुकवत नाही. म्हणूनच रोज योगा क्लास वा जिम बाहेर दिसते. सध्या वर्कआऊटनंतरचा मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. पण खरी बातमी पुढे आहे. होय, या व्हिडीओ मलायकामुळे नाही तर एका म्हाताऱ्या काकांमुळे चर्चेत आहेत. व्हिडीओ पाहून नेटकरी स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकत नाहीयेत.
मलायकाचा जिम लुक नेहमी चर्चेत असतो. पण सध्या ना मलायकाची चर्चा आहे ना, तिच्या जिम लुकची. चर्चा आहे ती व्हिडीओतील आजोबांची.
सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मलायका जिममधून बाहेर कारकडे जात आहेत आणि आजोबा तिच्या बाजूला उभे आहेत. या आजोबांना पाहून नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक भारी कमेंट्स केल्या आहेत. चाचा ऑन टारगेट’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. अरे चाचा क्या देख रहे हो? असा सवाल एका युजरने केला आहे. चाचा इन शॉक, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ‘पिछे वाले चाचा भी सोच रहे होंगे किन जीव जंतुओं के साथ रहना पड रहा है,’ अशी कमेंट एका युजरने केली आहे. काही लोकांनी मलायकाच्या जिम आऊटफिटवरून तिला ट्रोलही केलं आहे.
मलायका अरोला नुकतीच व्हॅकेशनवरून परतली आहे. बॉयफ्रेन्ड अर्जुन कपूरसोबत मलायका पॅरिसमध्ये व्हॅकेशनवर गेली होती. या व्हॅकेशनचे अनेक रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मलायका दीर्घकाळापासून अर्जुन डेट करतेय. लवकरच हे कपल लग्न करणार, असं मानलं जात आहे.