हाय गरमी...म्हणत मलायका अरोराने छोट्या ड्रेसमधील फोटो केला शेअर, फॅन्सची बोलती बंद...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 12:37 PM2022-03-09T12:37:45+5:302022-03-09T12:41:20+5:30

मलायका कायमच तिच्या फॅशनसेन्सकडे लक्ष देत असते. त्याचसोबत मलायका आपल्या हॉट अदा आणि फोटोंमुळे चर्चेत असते.

Malaika arora summer look white short and crop top | हाय गरमी...म्हणत मलायका अरोराने छोट्या ड्रेसमधील फोटो केला शेअर, फॅन्सची बोलती बंद...

हाय गरमी...म्हणत मलायका अरोराने छोट्या ड्रेसमधील फोटो केला शेअर, फॅन्सची बोलती बंद...

googlenewsNext

मलायका अरोरा आज बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सध्याच्या काळात मलायका तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे जास्त चर्चेत येत आहे. मलायका सध्या अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. मलायका आपल्या हॉट अदा आणि फोटोंमुळे चर्चेत असते.  सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडीओ फॅन्सासाठी नेहमीच शेअर करत असते. तिचे फॅन्सदेखील तिच्या फोटोंवर फिदा असतात. नुकताच मलायकाने स्वतःचा असा एक फोटो शेअर केला आहे जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

मलायकाचा फोटो झाला व्हायरल
मलायकाने व्हाईट प्लेन शॉर्ट्स आणि क्रॉप टॉपमध्ये एक फोटो शेअर केला आहे.. मलायकाने ब्लॅक बॅग आणि ब्लॅक बेल्टसह तिचा लूक कम्प्लीट केला आहे. मलायका फोटोत आनंदी दिसतेय. हे तिच्या चेहऱ्यावरचे हास्य सांगत आहे. मलायकाचा हा फोटो परदेशातील आहे, जिथे ती व्हेकेशनसाठी गेली होती.

मलायकाचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. एका चाहत्याने लिहिले तू एकदम व्हाइट व्हॅनिला आईस्क्रीमसारखी दिसत आहेस. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, "तुझा हा लूक बेस्ट आहे. समरसाठी ते सगळ्यात चांगला" मलायकाच्या या फोटोला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लाईक्स आले आहेत. 

मलायका कायमच तिच्या फॅशनसेन्सकडे लक्ष देत असते. त्यामुळे ती अनेकदा नवनवीन फॅशन कॅरी करताना दिसते. फॅशनप्रमाणे मलायका फिटनेसबाबत ही सजग दिसते अनेकवेळा ती जिम बाहेर स्पॉट होते. 
 

Web Title: Malaika arora summer look white short and crop top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.