Malaika Arora : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच मलायका अरोरा पोहचली 'स्पेन'मध्ये, शेअर केले Super Hot फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 04:45 PM2024-07-15T16:45:42+5:302024-07-15T16:47:06+5:30

मलायका अरोरा ही स्पेनमध्ये पोहचली आहे.

Malaika Arora Turns Up the Heat in Neon Green Bikini photos on social media from Spain amidst breakup news with Arjun Kapoor | Malaika Arora : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच मलायका अरोरा पोहचली 'स्पेन'मध्ये, शेअर केले Super Hot फोटो!

Malaika Arora : अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपच्या चर्चांमध्येच मलायका अरोरा पोहचली 'स्पेन'मध्ये, शेअर केले Super Hot फोटो!

बॉलिवूडची हॉट मॉडेल आणि अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. प्रोफेशनल लाइफपेक्षाही ती तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते. सध्या मलायका आणि अर्जुन कपूरच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. राधिका-अनंत अंबानीच्या लग्नातही मलायका अरोरा ही अर्जून कपूरसोबत दिसली नाही. यामुळे या चर्चांनी अधिकच जोर पकडला आहे.  यातचा आता मलायका अरोरा ही स्पेनमध्ये पोहचली आहे. काही सुपर हॉट फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

मलायका अरोरा ही स्पेनमध्ये धमाल करताना दिसत आहे. अभिनेत्रीने बिकिनीतील काही फोटो शेअर केले आहेत. निऑन कलरच्या बिकिनीमधला मलायकाचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. मलायकाचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहते तिची प्रशंसा करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. एकाने कमेंट करत लिहिलं, 'ती 50 वर्षांची आहे यावर विश्वास बसत नाही'. तर दुसऱ्या युजरने कमेंट केली, 'काय दिसतेय... तौबा, तौबा, तौबा'. 

मलायकाने शेअर केलेल्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. या फोटोंमध्ये तिची कर्वी फिगर दिसून येत आहे. तिची फिगर पाहून चाहते तिला बॉलीवूडची फिटनेस क्वीन असंही म्हणत आहेत. मलायका आणि तिचं फिटनेस प्रेम तर जगजाहीर आहे. फिटनेसबाबत आपले चाहतेही आपल्याप्रमाणेच जागरुक असावेत, हा तिचा प्रयत्न असतो. त्यामुळेच तर सोशल मिडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या फिटनेस टिप्स शेअर करत असते.  मलायका बऱ्याच काळापासून चित्रपटांमध्ये सक्रिय नाही, पण ती कायम चाहत्यांच्या नजरेत असते. 

Web Title: Malaika Arora Turns Up the Heat in Neon Green Bikini photos on social media from Spain amidst breakup news with Arjun Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.