मलायका अरोराच्या आईला कधी पाहिलंय का? राहणीमान आहे अगदीच साधं
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 18:30 IST2022-03-02T18:30:30+5:302022-03-02T18:30:58+5:30
Malaika arora: अलिकडेच मलायकाने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघी मायलेकी दिसून येत आहेत.

मलायका अरोराच्या आईला कधी पाहिलंय का? राहणीमान आहे अगदीच साधं
बॉलिवूडची मोस्ट गॉर्जियस अॅड स्टायलिश दिवा म्हणून ओळखली जाणारा अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. अनेकदा मलायका तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. यात खासकरुन तिचा फिटनेस आणि बोल्डनेस यांची चर्चा होते. मात्र, यावेळी पहिल्यांदाच तिच्या ऐवजी तिच्या आईची चर्चा होताना दिसत आहे.
अलिकडेच मलायकाने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दोघी मायलेकी दिसून येत आहेत. विशेष म्हणजे हा एक थ्रोबॅक फोटो असून मलायकाची आई अत्यंत साध्या पद्धतीने राहत असल्याचं या फोटोवरुन लक्षात येतं.
फोटोतील 'या' चिमुकलीला ओळखलं का? बोल्डनेसमुळे आज सगळ्यांना करतीये 'क्लीन बोल्ड'
मलायकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघी मायलेकी पाऊट करताना दिसत आहेत. 'अरोरा कुटुंबाच्या पाठीचा कणा.. आमची आई', असं कॅप्शन मलायकाने या फोटोला दिलं आहे. दरम्यान, मलायकाची आई फार कमी वेळा प्रसारमाध्यमांसमोर येते. यापूर्वी तिचा आणि अरबाजचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून अरबाज आणि मलायकाच्या आईमधील छान बॉण्डिंग पाहायला मिळालं होतं.