मलायका अरोराचे खास ओणम सेलिब्रेशन, ट्रेडिशनल लूकनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 18:28 IST2023-08-29T18:27:10+5:302023-08-29T18:28:26+5:30
मलायका अरोराचा ड्रेसिंग सेन्स अप्रतिम आहे. आता पुन्हा एकदा ओणम पार्टीदरम्यान तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला.

Malaika Arora Onam Celebration
अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या फॅशन आणि ट्रेंडी डान्समुळे चर्चेत असते. मलायका अरोराचा ड्रेसिंग सेन्स अप्रतिम आहे. आता पुन्हा एकदा ओणम पार्टीदरम्यान तिचा स्टनिंग लूक पाहायला मिळाला. ज्यामध्ये ती, तिची आई आणि बहीण अमृता अरोरासोबत दिसली.
मलायकाने ओणम सेलिब्रेशनचे काही फोटोज शेअर केले आहेत. ज्यामध्ये जेवणाच्या टेबलावर पारंपारिक शैलीत चविष्ट पदार्थ सजवलेले दिसत आहेत. शिवाय मलायकाने सर्वांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ओणम सणाच्या निमित्ताने मलायका अनारकली सूटमध्ये स्पॉट झाली. तिचा हा पारंपारिक लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
दक्षिण भारतातील मुख्य सणांपैकी एक समजला जाणारा ओणम हा सण आहे. हा सण अवघ्या भारतात १० दिवस साजरा केला जातो. या वर्षी हा सण २० ऑगस्टपासून सुरू झाला आहे.
मलायकाची आई मल्याळी कॅथलिक आहे तर वडील अनिल अरोरा पंजाबी होते. जेव्हा मलायका ११ वर्षांची होती तेव्हा तिचे आईवडील वेगळे झाले. त्यांचा घटस्फोट झाला होता.