बाबो..! अर्जुन कपूरकडून मलायका अरोराचा 'तो' व्हिडीओ झाला शेअर; होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 13:15 IST2021-12-11T13:15:05+5:302021-12-11T13:15:36+5:30
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत.

बाबो..! अर्जुन कपूरकडून मलायका अरोराचा 'तो' व्हिडीओ झाला शेअर; होतेय चर्चा
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) रिलेशनशीपमध्ये असल्याचे जगजाहीर आहे. ते नेहमी एकत्र स्पॉट होतात. दरम्यान आता ते दोघे सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत आणि तिथले फोटो आणि व्हिडीओ ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. या व्हॅकेशनमधील मलायकाचे बिकनीतील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तसेच नुकताच अर्जुन कपूरने शेअर केलेला व्हिडीओदेखील चर्चेत आला आहे.
अर्जुन कपूरने सायकल चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात अर्जुन कपूर सायकल चालवत असताना एक व्हिडिओ बनवत आहे. तर मलायका त्याच्या मागे येत आहे. व्हिडिओ शेअर करत अर्जुनने लिहिले की, जेव्हा तिला जरा देखील अंदाज नसतो की, तुम्ही तिचा व्हिडिओ बनवत आहात.
यासोबतच मलायकाचा व्हिडिओ शेअर करत अर्जुन कपूरने लिहिलंय की, तुम्हाला माहित नाही की, ती सायकलिंगमध्ये एक्सपर्ट आहे. मलायका अरोरा खुल्या आकाशाखाली निळ्या पाण्याच्या काठावर सुट्टीचा आस्वाद घेत आहे.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. काही दिवसांपासून अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघेही वेगळे होणार आहेत, अशी चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटो पाहून या चर्चांना पूर्णविराम लागला.