ब्लेझरसोबत टॉपऐवजी फक्त 'ब्रा' घातल्यामुळे मलायका अरोरा झाली ट्रोल, युजर्स म्हणाले- 'हिला...'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:01 PM2022-05-26T12:01:54+5:302022-05-26T12:02:15+5:30

Malaika Arora: करण जोहर(Karan Johar)च्या पार्टीत बॉलिवूडच्या कलाकारांची मंदियाळी पाहायला मिळाली. या पार्टीत सेलेब्रिटी ग्लॅमरस लूकमध्ये पाहायला मिळाले. मात्र सर्वात बोल्ड आणि सिझलिंग अंदाजात अभिनेत्री मलायका अरोरा पाहायला मिळाली. मात्र या गेटअपमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केले आहे.

Malaika Aurora became a troll because she only wore a bra instead of a top with a blazer, users said- 'Hila ...' | ब्लेझरसोबत टॉपऐवजी फक्त 'ब्रा' घातल्यामुळे मलायका अरोरा झाली ट्रोल, युजर्स म्हणाले- 'हिला...'

ब्लेझरसोबत टॉपऐवजी फक्त 'ब्रा' घातल्यामुळे मलायका अरोरा झाली ट्रोल, युजर्स म्हणाले- 'हिला...'

googlenewsNext

बॉलिवूडची सुपर गॉर्जियस अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हिच्या ड्रेसिंग सेन्सचे कौतुक करावे तितके कमीच आहे. टोन्ड फिगरमधली मलायकाची बोल्ड स्टाईल सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. वयाची चाळीशी उलटलेली असतानाही मलायका आजही बोल्डनेसच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना टक्कर देते. नुकताच बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar)च्या ५०व्या वाढदिवसाची जंगी पार्टी पार पडली. या पार्टीला बॉलिवूडमधील बऱ्याच सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. यावेळी मलायका अरोराने केलेली स्टाईल चर्चेत आली. परंतु मलायकाची ही बोल्ड स्टाईल काही लोकांना आवडला नसल्याचे पाहायला मिळत आहे. तिने केलेल्या गेटअपमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.

करण जोहरच्या पार्टीत बॉलिवूडचे सर्व मोठे सेलिब्रिटी एकाहून एक सरस लूकमध्ये पोहोचले होते. पण या सगळ्यात मलायकाने सर्वात बोल्ड आणि सिझलिंग अंदाजात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मलायका पार्टीमध्ये लूज ब्लेझर आणि निऑन ग्रीन कलरच्या शॉर्ट्समध्ये दिसली. ब्लेझरसोबत तिने पिंक रंगाची ब्रा परिधान केली होती. तिच्या या बोल्ड आणि हटके लूकची सर्वत्र चर्चा होते आहे. 

काहींना मलायकाची ही स्टाईल खूप आवडली तर काहींना ती खटकली. तिला या ड्रेसिंग स्टाईलसाठी सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांनी वाईटरित्या ट्रोल केले आहे. एका युजरने म्हटले की- कपड्यांची खराब निवड. दुसर्‍या युजरने लिहिले - टॉप घालायला विसरली. आणखी एका युजरने म्हटले की हिला संग्रहालयात ठेवा.

Web Title: Malaika Aurora became a troll because she only wore a bra instead of a top with a blazer, users said- 'Hila ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.