तो माणूस नव्हे, हैवान आहे...,साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर पीडितेचा बलात्काराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 15:00 IST2022-04-27T14:58:35+5:302022-04-27T15:00:45+5:30
Me Too : याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अभिनेत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या घटनेने मनोरंजनसृष्टीत खळबळ माजली आहे.

तो माणूस नव्हे, हैवान आहे...,साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर पीडितेचा बलात्काराचा आरोप
Me Too : मल्याळम चित्रपटसृष्टीत सध्या खळबळ उडाली आहे. मल्याळम अभिनेता विजय बाबू (Vijay Babu) याच्यावर एका महिलेने अनेक गंभीर आरोप केले आहेत. महिलेने विजय बाबूवर बलात्काराचा आरोप केला आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने लैंगिक शोषण केल्याचा महिलेचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अभिनेत्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. या घटनेने मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
विजयबाबू हे मल्याळम चित्रपटसृष्टीतील मोठं नाव आहे. आपल्या करिअरमध्ये त्याने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. अभिनयासोबत तो निर्माता सुद्धा आहे. फ्राईडे फिल्म नावाचं त्याचं प्रॉडक्शन हाऊस आहे.
कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने विजय बाबूविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. इंडस्ट्रीत नवी असताना विजयबाबूने आधी आपल्याशी मैत्री केली आणि नंतर मैत्रीच्या नावाखाली आपलं लैंगिक शोषण केलं, असा आरोप महिलेने तिच्या तक्रारीत केला आहे. शरीरसंबंधांना नकार दिल्यावर विजय बाबू आपल्यावर बळजबरी करायचा. नशेचं औषध देत किंवा मद्य पाजून आपल्यावर बलात्कार करायचा. विजय बाबू हैवान आहे. त्याने एक ते दीड महिने माझं शारिरिक व मानसिक शोषण केलं. याबद्दल वाच्यता केल्यास बर्बाद करण्याची धमकी दिली. प्रायव्हेट व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असं महिलेने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे.